Bigg Boss Marathi 5 : सामान्य घरातील मुलगा, रीलस्टार सूरज चव्हाण सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आहे. ‘बिग बॉस मराठी’चा सध्या सहावा आठवडा सुरु असून या घरात सध्या सूरजचे कौतुक होताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील त्याच्या खेळाबद्दल ‘बिग बॉस मराठी’चा होस्ट रितेश देशमुख यानेदेखील अनेकदा सूरज चव्हाणचं कौतुक केलं आहे. तसंच सूरज चव्हाणच्या अनेक चाहत्यांचादेखील त्याला पाठींबा मिळताना पाहायला मिळत आहे. पण त्याला या घरातील टास्क व गेम कळत नसल्याबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. रितेशनेदेखील त्याने खेळ समजून घेऊन मग खेळावा असं म्हटलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
अशातच आजच्या भागात सूरजला त्याच्या खेळाबद्दल अभिजीत व पॅडी कांबळे समजावणार आहेत. त्याने खेळ कसा खेळला पाहिजे? आणि खेळताना काय विचार केला पाहिजे असं म्हणत त्याला खेळाबद्दल समज देणार आहेत,. याआधी सूरजलं घरातील अंकिता, डीपी व वैभव यांनी खेळ समजावून सांगितला आहे. त्याला खेळ नीट कळत नसल्यामुळे किंवा उशिराने कळत असल्यामुळे घरातील अनेक स्पर्धकांनी त्याला खेळ समजावून सांगितला आहे. आशातकढ सोमवारी सूरजने अरबाजला नॉमिनेशन टास्कमध्ये अचानक वाचवले आणि त्याच्या या निर्णयानंतर त्याला पॅडी व अभिजीत यांनी समजावललं आहे.
आजच्या भागात सूरज अभिजीत व पॅडी यांना असं म्हणतो की, “मी आता लय बेकार गेम खेळणार आहे”. यावर अभिजीत त्याला असं म्हणतो की, “तू दहावेळा विचार. पंधरा वेळा विचार. काय बरोबर आहे काय चूक आहे. पण तू असंच कुणाचं नाव घेऊ नको”. यावर सूरज “नाही मी कुणाचं नाव का घेऊ? माझ्या मनानेच मी नाव घेणार”. सूरजने नॉमिनेशन टास्कमध्ये अरबाजला नॉमिनेट करण्यापासून वाचवलं होतं. याबद्दल पॅडी कांबळे सूरजला समजावत असं म्हणतात की, “तू अरबाजचा फोटो उगाच ठेवून दिला. त्याला नॉमिनेट करायला पाहिजे होतं. तू एकाचे नाव दिलं असतं तरी चाललं असतं. तो नॉमिनेशनमध्ये जाणारचं होता. पण तू अरबाजचा फोटो ठेवताना माझ्या डोक्यात असं आलं की, तू थांब आणि अरबाजबद्दल काय वाटतं ते सांग”.
पुढे पॅडी सूरजची समजूत काढत त्याला खेळाविषयी समजावून सांगत असं म्हणतो की, “तू खेळ चालू असताना किंवा तो खेळ संपल्यानंतर त्यावर लक्ष ठेवायचं आणि लक्षातही ठेवायचं. लक्ष पण ठेवायचं आणि लक्षातही ठेवायचं”. यावर सूरज असं म्हणतो की, “माझ्या लक्षातच राहत नाही”. यावर पॅडी पुन्हा त्याला असं म्हणतो की, “मी तुला जे सांगतोय त्यावर तू प्रयत्न कर. जेवढे होतील तेवढे प्रयत्न कर”