Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’चं घर आणि वाद हे समीकरण काही जुनं नाही. या घरात काही ना काही कारणावरुन वाद होतात आणि त्या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात होते. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आता सहावा आठवडा सुरु आहे. पाचव्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीप्रमाणे गोंधळ पाहायला मिळाला. पण पाचवा आठवडा खास होता. कारण सदस्यांच्या जोड्या बनवल्या होत्या. याच जोड्या आठवडाभर एकत्र खेळ खेळताना दिसल्या. मात्र यावेळीही जोरदार वाद झाले. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’चा सहावा आठवडादेखील दणक्यात सुरू झाला आहे आणि या आठडव्याची सुरुवातही वादांनीच झाली. ‘बिग बॉस मराठी’च्या सोमवारच्या भागात घन:श्याम व जान्हवी यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि यात दोघांचे जोरदार भांडण झाले. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात घन:श्याम, वैभव व जान्हवी एकत्र बसलेले असतात. तेव्हा जान्हवी घन:श्यामला असं म्हणते की, “तुला लाज आहे का घन:श्याम? ज्यांच्याकडून तू व्यायाम करुन घेतो, वैभव माझा गुरु आहे. तो मला व्यायाम शिकवतोअसं म्हणतोस आणि त्यांच्याच मागे त्यांच्याशी भांडण करतोस.” यावर घन:श्याम असं म्हणतो की, “आता तुझ्याकडून तेवढंच शिकायचं राहिलं आहे. बाकी सगळं शिकलो आहे. तुझ्याकडे थोडी लाज शिल्लक आहे. म्हणजे मला ती लाज घेता येईल”. घन:श्यामच्या या बोलण्याचा जान्हवीला राग येतो आणि ती त्याला रागावून असं म्हणते की, “आता इथून उठ. नाहीतर माझं डोकं सटकलं तर मला माहित नाही मी काय करेन”. यावर आधी घन:श्याम मस्करीत नको नको असं म्हणतो आणि मग तोही रागात उठून जातो. यापुढे त्यांच्यात जोरदार भांडण होतं.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा एकदा निक्कीची मनमानी, सर्व नियम मोडले अन्…; शिक्षा होणार का?
यापुढे जान्हवी त्याला असं म्हणते की, “यापुढे माझ्याशी बोलताना सांभाळून बोलत जा. जास्त शहाणपणा करु नको आणि माझ्यापुढे तर नाहीच नाही. इथे आमच्यात बसायला आणि शहाणपणा करायला येऊ नकोस. गप्प आहेस तिथेच रहा. तुझा शहाणपणा दुसरीकडे कर माझ्यापुढे नाही”. यावर घन:श्याम असं म्हणतो की, “तू मला सांगू नकोस मी काय करायचं आणि काय नाही.” यावर जान्हवी असं म्हणते की, “तुला हे सगळं सांगावं लागत आहे कारण तू मूर्ख आहेस. पुन्हा माझ्याकडे वाकडेतिकडे डोळे घेऊन आला तर मला माहीत नाही मी काय करेन”. तसंच ती तिच्या तोंडात येणारे काही शब्द रोखते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सहाव्या आठवड्यात ‘हे’ स्पर्धक झाले नॉमिनेट, कोण घराबाहेर जाणार? आणि कोण सुरक्षित होणार?
दरम्यान, सोमवार, २ सप्टेंबरला नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या सात सदस्यांपैकी या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.