गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “आपल्या नावांचा वापर केला आणि…” ; इतरांच्या विरोधात जाऊन अभिजीत-निक्कीमध्ये एकी, म्हणाली, “सगळे विरोधात…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 2, 2024 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Nikki Tamboli and Abhijeet Sawant discussion she said that other contestant used our names video viral

Bigg Boss Marathi 5 च्या घरामधील निक्की-अभिजीतच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व कमालीचं गाजलं. अवघ्या काही दिवसांवरच ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घरात एकूण सात स्पर्धक आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आता शेवटचा आठवडा सुरु झाला असून येत्या ०६ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस मराठी ५’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता हा सीझन शेवटच्या टप्प्यात असून काहीच दिवसांत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता मिळणार आहे. दरम्यान निक्कीने टास्कमध्ये बाजी पहिलं ‘तिकीट टू फिनाले’ मिळवलं आहे. त्यामुळे आता घरातील इतर स्पर्धकांमध्ये ‘तिकीट टू फिनाले’साठी स्पर्धा सुरु आहे. त्यातच घरात आता मीड वीक नॉमिनेशन देखील होईल. त्यामुळे अगदी कोणत्याही क्षणी कोणत्याही स्पर्धकाचा खेळ संपू शकतो. 

या पर्वात निक्की व अभिजीत यांची जोडी चांगलीच गाजली. या जोडीमध्ये कधीकधी भांडण, वाद विवाद झाले असले तरी मित्र म्हणून त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. मध्यंतरी दोघांच्या मैत्रीबद्दल अनेक प्रश्न उठवण्यात आले होते. मात्र यांचा या दोघांवर तसा काहीही फरक पडलेला दिसून आला नाही. अभिजीतच्या बायकोनेदेखील दोघांच्या मैत्रीवर पूर्णपाने विश्वास ठेवत माझा माझ्या नवऱ्यावर दोनशे टक्के विश्वास असल्याचे तिने सांगितले. अशातच आता या दोघांमध्ये चर्चा होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर दोघांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.    

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – जयपूरमध्ये तृप्ती डिमरीवर बंदी, चेहऱ्याला काळंही फासलं अन्…; अभिनेत्रीवर नागरीक संतप्त, नेमकं प्रकरण काय?

या व्हिडीओमध्ये निक्की अभिजीतला असं म्हणते की, “जिथे विश्वासूपणा आणि निष्ठा असेल तिथे निक्की तांबोळी असेल. हे वाक्य माझ्यासाठी वापरण्यात आले. का? कारण, मी माझ्या ग्रुपसाठी, घन:श्यामसाठी, जान्हवीसाठी आणि सुरुवातीपासून माझ्याबरोबर जे जे होते त्या सर्वांसाठी मी आधीपासूनच निष्ठावान होते. हेच सगळं मला चक्रव्ह्यूमध्ये दाखवण्यात आले होते. सगळेजण ग्रुप करुन बोलायचे. अंकिता, डीपी हे सगळे एकत्र येऊन बोलायचे की आपण सी ग्रुप काढला पाहिजे म्हणून. पहिल्या दिवसापासूनच तुझ्या आणि माझ्याविरुद्ध सगळं घर एकत्र होतं. फक्त दिखाव्यासाठी ग्रुप होते. आपली नावे मोठी आहेत म्हणून आपला वापर झाला. पण हे आपल्याला समजलं नाही”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 मधील निक्की-आर्या यांच्या ‘त्या’ वादावर संग्राम चौगुलेंचा मोठा खुलासा, म्हणाले, “निक्कीने मारायचा प्रयत्न केला आणि…”

यापुढे अभिजीत तिला असं म्हणतो की, “हेच ‘टीम बी’बद्दलदेखील आहे”. तेव्हा निक्की त्याला असं म्हणते की, “मी टीम बद्दलच बोलत आहे, ‘ए टीम’ तर सुरुवातीपासूनच तशी होती, पण टीम बीबद्दलही ही सारखच होतं”. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सेलिब्रेशन वीक सुरु आहे. यासाठी आपला माणूस शिव ठाकरे या घरात आला आहे.  ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पर्वाचा विजेता कोण होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli and Abhijeet SawantNikki Tamboli and Abhijeet Sawant discussion
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Marathi actress Khushboo Tawde and Sangram Salvi become a second time parents blessed with a baby girl

मुलगी झाली हो! खुशबू तावडे व संग्राम साळवी यांना कन्यारत्न, कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.