‘ॲनिमल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात राजकुमार रावचीही भूमिका आहे. अभिनेत्री या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांचा हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच तृप्ती डिमरी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका कार्यक्रमासाठी पैसे घेऊनही त्या कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याचा आरोप अभिनेत्री तृप्ती डिमरीवर करण्यात येत आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरीने फी घेऊन कार्यक्रमाला हजेरी न लावल्याचा आरोप जयपूरच्या इव्हेंट आयोजकांनी केला आहे. (Tripti Dimri Face Blackened)
तृप्ती डिमरी हिच्यावर जयपूरमधील एका कार्यक्रमासाठी साडे पाच लाख रुपये मानधन घेतल्याचा दावा कार्यक्रमाच्या आयोजकांकडून केला जात आहे आणि त्यानंतर तिने कार्यक्रमालाही हजेरी लावली नसल्याचा आरोप आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये काही महिला तृप्ती डिमरीवर आरोप करताना आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा दावा करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला म्हणतेय की “तिचे (तृप्ती डिमरी) चित्रपट कोणीही पाहणार नाही. आश्वासन देऊनही ती आली नाही, तिने आपला वेळ मॅनेज करायला शिकावं. ती अजून एवढी मोठी झाली नाहीय, तिचं नावही कुणाला माहीत नाही”.
Muh Kaal Karo 😱 #TriptiDimri skips event after taking 5 Lacs; Women group blackened her poster #MovieTalkies pic.twitter.com/45spP3LrMa
— $@M (@SAMTHEBESTEST_) October 1, 2024
यापुढे ती महिला असं म्हणते की, “ ती कोण आहे हे पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. ती सेलिब्रिटी म्हणवण्याच्या लायकीची नाही”. या व्हिडीओमध्ये ती महिला तृप्तीच्या पोस्टरला काळ्या मार्करने क्रॉस करताना दिसत आहे आणि म्हणते आहे की, “तिचा चेहरा काळा करा”. तर कार्यक्रमामधील दुसरी महिला म्हणत आहे की, “आम्ही तिच्यावर गुन्हा दाखल करु. जयपूरने तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा. तिने आज आमची प्रतिष्ठा डागाळली आहे. तिने माझ्याकडून साडे पाच लाख रुपये घेतले आहेत. तिने येथील सर्वांचा अनादर केला. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकूया”.
दरम्यान, आरोपांना इट्स मज्जा दुजोरा देत नाही, तसेच तृप्ती डिमरीकडूनही या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तृप्तीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. तिचा कार्तिक आर्यनबरोबरकहा ‘भूल भुलैया ३’ देखील लवकरच येणार आहे आणि ती ‘धडक २’ मध्ये सिद्धांत चतुर्वेदीबरोबर दिसणार आहे.