Khushboo Tawde Baby Girl : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे खुशबू तावडे व संग्राम साळवी ही जोडी. प्रेक्षकांची लाडकी जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे. ही आनंदाची बातमी नुकतीच खुशबूने सोशल मीडियावरून जाहीर केली. ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’मधून खुशबूने एक्झिट घेतली. यावेळीच खुशबू दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं समोर आलं होतं. तसंच खुशबूने तिच्या गरोदरपणाबद्दलचा एक व्हिडीओही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला होता. “थोडंसं आणखीन प्रेम आमच्या कुटुंबात सामिल होतं आहे”, असं कॅप्शन देत खुशबूने नवरा संग्राम व मुलगा राघव यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर केला होता. (Khushboo Tawde and Sangram Salvi Baby Girl)
अखेर अभिनेत्री खुशबू तावडे आई झाली आहे. नुकतेच ते दोघे दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत. त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. २ नोव्हेंबर २०२१ रोजी खुशबूने एका गोंडस मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव राघव आहे. अशातच अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांनी नुकतीच चाहत्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. त्यांना मुलगी झाल्याचे समजते आहे. सहअभिनेत्री वैशाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे खुशबूला मुलगी झाली असल्याचे म्हटलं आहे. अभिनेत्रीने दोघींचा फोटो शेअर करत ‘its a girl’ असं म्हणत अभिनंदन केलं आहे
खुशबूने ऑगस्ट महिन्यात तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल सोशल मीडियावर जाहीर केले होते. त्यावेळी ती झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी मालिकेत काम करत होती. तिने सोशल मीडियावर जाहीर करत मालिकेतूनही निरोप घेतला होता. जवळपास सातव्या महिन्यांपर्यंत तिने मालिकेत काम केले होते. तिने मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी पल्लवी वैद्य पाहायला मिळाली होती.
दरम्यान, अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडपे आहे. त्यांनी २०१८ साली लग्न केले. तर त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिला मुलगा झाला. त्यांच्या या तीन वर्षीय मुलाचे नाव राघव असून लवकरच खुशबूच्या घरी आता एका चिमुकलीचेदेखील आगमन झाले आहे. यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.