Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता आठवा आठवडा सुरु झाला आहे. त्यामुळे घरातील स्पर्धकांमध्ये घरात टिकून राहण्यासाठी व अंतिम सोहळ्यापर्यंत टिकून राहण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशातच या घरातील नात्यांची समीकरणेही बदलतानाचे पाहायला मिळत आहे. घरात सुरुवातीला मित्र असणारे आता एकमेकांच्या विरोधात उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाण हा अतिशय स्ट्रॉंग प्लेअर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला टास्क कळायला वेळ लागत असला तरी तो टास्क पूर्ण ताकदीने खेळतो. घरातील टास्कबद्दल अंकिता व पॅडी त्याला वेळोवेळी समजावत असतात. (Bigg Boss Marathi 5 Mira Jagannath)
‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधून सूरज व डीपी यांच्यात काही कारणावरुन बाचाबाची झाली असून त्यांच्यात झालेल्या या बाचाबाचीमध्ये अंकिता मध्यस्थी करणार आहे. यामुळे अंकिता सूरजची समजूत काढताना दिसली. यावेळी अंकिता सूरजला समजावत म्हणाली की, “तू असं कसं म्हणालास त्यांना की मला सांगू नका माझं काय करायचं ते… असं बोलणं चांगलं आहे का? असं नाही बोलायचं…” यावर सूरज असं म्हणतो की, “मी माझं सांगितलं. मी बोलत असताना ते मध्ये बोलले म्हणून मी बोललो. नाही तर मी असं मध्ये कुणाला काही बोलत नाही”.

या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच सुप्रसिद्ध अभिनेत्री व ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेली मीरा जगन्नाथनेही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मीराने अंकिता-सूरजचा हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत असं म्हटलं आहे की, “हिला जसं खेळायचंय तसं खेळते… आणि दुसऱ्यांना अडवते. असं नको खेळू, तसं नको खेळू…”. तसंच तिने सूरजला “लढ बापू” असंही म्हटलं आहे.
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासून या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या या पाचव्या पर्वाबद्दल, घरातील सदस्यांबद्दल अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. उत्कर्ष शिंदे, मेघा धाडे, जय दुधाणे यांसह अनेक मंडळी निग बॉस मराठीच्या नवीन सीझनबद्दल व या घरातील स्पर्धकांबद्दल सोशल मीडियावर आपली मतं मांडत असतात. अशातच मीराने अंकिताबद्दल भाष्य केलं आहे.