Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा होताना पहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवीन कॅप्टन पदासाठी चुरशीची लढत सुरु असताना नको ते घडलं आणि चर्चेला आणखी एक कारण मिळालं. निक्की व आर्या यांच्यात भांडण झालं आणि या भांडणात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर आर्याला ‘बिग बॉस’ने जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. यानंतर ‘बिग बॉस’ने सांगितलं की, आर्याला काय शिक्षा द्यायची याचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल. अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखही आर्याबद्दल एक मोठा निर्णय घेणार असल्याचे दिसून येत आहे.
आजच्या भाऊचा धक्कामध्ये ‘बिग बॉस’ आर्याच्या बाबतीत नक्की काय निर्णय देणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आर्याने ‘बिग बॉस’च्या घरातील निर्णय मोडला असला तरी नेटकरी मात्र आर्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. आर्याने निक्कीबरोबर जे काही केलं ते योग्यच आहे असं म्हणत अनेकांनी तिचे समर्थन केलं आहे. निक्कीला अद्दल घडायला हवी होती, आर्याने योग्य केलं असे अनेकांनी म्हटलं आहे. या घटनेनंतर मराठी कलाकारदेखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
र्याने निक्कीला कानशिलात लगावल्याच्या घटनेवर ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धक व अभिनेता अभिजीत केळकरने एक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत त्याने “हा खेळ संयम आणि मानसिक संतुलनाचा आहे” असं म्हटलं आहे. याबद्दल अभिजीतने त्याची प्रतिक्रिया व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “आर्या, तुझं नडणं, तुझं भिडणं, एकटीनं खेळणं, सगळं आवडत होतं. पण हा खेळ संयमाचाही आहे, मानसिक संतुलनाचाही आहे. हिंसेचं समर्थन नाहीच करता येणार. पण तू माफी माग. तू genuien (खरी) आहेस, ते तुला नक्की एक संधी देतील”.
आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम रुपाली भोसलेच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, भावुक होत म्हणाली, “आजी…”
दरम्यान, आर्या व निक्की यांच्यातील भांडणात आर्याने निक्कीला थेट कानशिलात मारणं यावर सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे आर्याच्या कृतीचे समर्थन केलं असलं तरी ‘बिग बॉस’च्या घरातील मूलभूत नियमाचे उल्लंघन झाले असून याची योग्य ती शिक्षा आर्याला मिळणार आहे. त्यामुळे ही शिक्षा नेमकी काय असणार? हे आजच्या भाऊचा धक्कावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.