सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा सुरु आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकापेक्षा एक वरचढ स्पर्धक पाहायला मिळत आहे. या रिऍलिटी शोमध्ये अभिनेता व स्प्लिट्सविलाची जान असलेल्या अरबाज पटेलची एण्ट्रीलक्षवेधी ठरली. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये येत अरबाजने त्याच्या स्टाईल व स्वॅगने अनेकांची मन जिंकली आहेत. या घरात अरबाज विशेष चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या व निक्कीच्या मैत्रीमुळे. अरबाजची निक्कीबरोबरची मैत्री अगदी पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाली. अनेकदा वाद होऊनही त्यांनी एकमेकांची साथ बिलकुल सोडली नाही. (leeza bindra on arbaaz patel)
निक्की व अरबाजची जवळीक ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळत असली तरी खऱ्या आयुष्यात त्याची बाहेर गर्लफ्रेंड असून तो कमिटेड असल्याचं साऱ्यांना माहित आहे. अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्रा आहे. लिझा अरबाज ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर सातत्याने पोस्ट करताना दिसली. अरबाजबद्दल मेसेज किंवा कमेंट करु नका असं म्हणत तिने चाहत्यांना विनंती केली होती. मात्र आता त्याच लिझाने अरबाजबरोबरच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
लिझाने इन्स्टाग्रामवर बऱ्याच पोस्ट शेअर केल्या आहेत. त्या सर्व पोस्टमध्ये ती अरबाजबरोबर दिसत आहे. पहिल्या फोटोसह कॅप्शन देत तिने असं म्हटलं आहे की,”मी वचन देते की मी कायम तुझ्याबरोबर असेन”, आणि ही स्टोरी अरबाजला टॅग केली आहे. त्यानंतर अरबाजबरोबरचा रोमँटिक फोटो शेअर करत तिने म्हटलं आहे की, “तुझ्या चांगल्या व वाईट काळात मी नेहमी तुझ्याबरोबर असेन. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही”.
तर आणखी एक स्टोरी शेअर करत लिझाने असं म्हटलं आहे की, “मी अरबाजच्या आईला आपल्या मुलासाठी आशीर्वाद मागताना पाहिलं आहे. तो शोमध्ये फक्त त्याच्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो अजिबात चुकीचा नाही. तो चुकीचा तेव्हा असता जर त्या मुलीला माहीत नसतं की तो माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. रितेश सरांनी त्या मुलीला दोनदा सांगितलं आहे, तरीही…”, असं म्हणत निक्कीला टोला लगावला आहे. इतकंच नव्हे तर लिझाने एक पोस्ट शेअर करत असंही म्हटलं आहे की, “एक शो कोणाचंही नातं तोडू शकत नाही. होय. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. मी त्याच्याशी कधीच ब्रेकअप करणार नाही”.