बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे…’ फेम रुपाली भोसलेच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, भावुक होत म्हणाली, “आजी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 14, 2024 | 10:21 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rupali Bhosle Grandmother Death

जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर रुपाली भोसलेची भावुक पोस्ट

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचे समोर आलं आहे. रुपालीच्या आजीचं वृद्धापकाळाने निधन झालं असल्याची बातमी तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत दिली. रुपालीच्या आजी सुनंदा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान रुपालीने पोस्ट शेअर करत त्यांचे अंत्यसंस्कार व विधी हे त्यांच्या मूळ गावी खेड येथे होणार असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण भोसले कुटुंब खूप दुःखात असल्याचे पाहायला मिळतंय. रुपालीने पोस्ट शेअर करताच कलाकार मंडळी व तिचे चाहते ही शोक व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच तिच्या आजीला श्रद्धांजली वाहत आहेत. (Rupali Bhosle Grandmother Death)

आई-वडिलांबरोबरच आजी बरोबरचा बॉण्ड हा प्रत्येकाचा खूप खास असतो. काहींच्या आजी या त्यांच्याजवळ असतात तर काहींच्या गावाकडे असतात. आजीकडे गावी जात प्रत्येक जण हा खास बॉण्ड सावरताना दिसतो. रुपाली आणि तिच्या आजीचंही खूप खास बॉण्ड होतं. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवरुन काही दिवसांपूर्वीच रुपालीने घेतलेल्या तिच्या नव्या घराच्या आनंदात तिची आजीही सहभागी झाली होती.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी खूप साधा माणूस आहे”, पिझ्झा, केकसाठी सूरज चव्हाणचा नकार, म्हणाला, “असे पदार्थ समोर असतात पण…”

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

“आजी. भावपूर्ण श्रद्धांजली! आत्म्यास चिर:शांती लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना”, असं कॅप्शन देत रुपालीने तिच्या आजीबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत. रुपालीच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार मंडळी तिला धीर देताना दिसत आहेत. अश्विनी महांगडे व गौरी कुलकर्णी या कलाकारांनी रुपालीच्या पोस्टवर कमेंट तिच्या आजीला श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आर्याची जेलमध्ये रवानगी, भाऊच्या धक्क्यावर ‘बिग बॉस’ मोठी शिक्षा सुनावणार, घराबाहेर काढणार का?

मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. रुपाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. ती आयुष्यातील घडामोडीसंबंधीत फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Tags: marathi actressrupali bhosleRupali Bhosle Grandmother Death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 Daily Updates

“Bigg Boss च निक्कीचं पायपुसणं आहे”, आर्याला शिक्षा होणार कळताच प्रेक्षक भडकले, म्हणाले, “व्हिडीओ दाखवा नाही तर...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.