शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : सहाव्या आठवड्यात ‘हे’ स्पर्धक झाले नॉमिनेट, कोण घराबाहेर जाणार? आणि कोण सुरक्षित होणार?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 3, 2024 | 11:02 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Ghanshyam, Aarya, Dhananjay, Suraj, Abhijeet, and Arbaaz noinated.

Bigg Boss Marathi 5 मधून एकूण सात स्पर्धक झाले नॉमिनेट? कुणाचा पत्ता कट होणार?

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. या घरातील टास्क व गेमप्रमाणेच नॉमिनेशन टास्कलादेखील तितकंच महत्त्व असतं. प्रत्येक आठवड्यात या घरात नॉमिनेशन टास्क पार पडते आणि या टास्कमध्ये घरातील प्रत्येक स्पर्धक इतर स्पर्धकांचे या घरातील स्थान कसं कमी आहे हे सिद्ध करतो आणि स्वत:ला वाचवून इतरांना नॉमिनेट करतो. अशातच सोमवारच्या भागातही बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण बारा सदस्यांपैकी सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’ने नेमून दिलेल्या काही निकषांवर हा नॉमिनेशन टास्क पार पडला. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’ने या घरातून नॉमिनेशनसाठी निर्णय क्षमता, खेळाची समज आणि मतप्रदर्शन हे तीन निकष नेमून दिले होते आणि या निकषांच्या आधारावर घरातील सर्व सदस्यांनी नॉमिनेशनचा टास्क पर पडला. सहावा आठवडा खूप कठीण असणार आहे असं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं आहे. त्यानुसार हा आठवडा कठीण असल्याचे या टास्कवरुन दिसूनही आलं. नॉमिनेशन टास्कसाठी घरातील स्पर्धकांना बाहेर जाणाऱ्या सदस्यांचे फोटो असलेले पोस्टर फाडून ते कचऱ्याच्या पेटीत टाकायचे होते.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा एकदा निक्कीची मनमानी, सर्व नियम मोडले अन्…; शिक्षा होणार का?

या टास्कनुसार, अंकिताने घन:श्याम व सूरज यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर आर्याने अभिजीत व घन:श्याम यांचा उल्लेख केला. मग निक्कीने धनंजय व आर्याचे नाव घेतलं. त्यानंतर धनंजयने घन:श्याम व आर्याचं नाव घेतलं. त्यानंतर या टास्कमध्ये अरबाजने आर्या व धनंजय यांना नॉमिनेट केलं. मग  घन:श्यामने आर्या व धनंजयचे नाव घेत त्यांना नॉमिनेट केलं. पुढे जान्हवीने घन:श्यामन व सूरजला नॉमिनेट केलं. मग पॅडीने अरबाज व घन:श्यामला नॉमिनेट केलं. मग वैभवने निक्की व आर्या यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर सुरजने निक्की व घन:श्याम यांना नॉमिनेट केलं.

आणखी वाचा – सूरज चव्हाणने घातलं ‘झापूक झुपूक’ लिहिलेलं खास डिझाइनर शर्ट, रिलस्टार करत आहेत त्याचीच कॉपी, महाराष्ट्राला वेड लावलं अन्…

पुढे अभिजीतने आर्या व घन:श्याम यांचे नॉमिनेशनसाठी नाव घेतलं. मग वर्षा यांनी धनंजय व सूरज यांचे नाव घेत या दोघांना नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या सात सदस्यांमधून कोण बाहेर जाणार हे येत्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे ‘बिग बॉस’ प्रेमींचं लक्ष लागलं आहे.  

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi NewsBigg Boss Marathi 5 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Namrata Sambherao viral video

Video : जुन्नरमधील नम्रता संभेरावच्या घरी जागरण गोंधळ, संबळवर नवऱ्यासह धरला ठेका, साधेपणाचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.