शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्या बाईच्या मनात…”, वर्षा उसगांवकरांना नडणार असल्याचं डीपीचं वक्तव्य, अंकिताने समजावूनही म्हणाला, “त्यांना रडवणार…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 4, 2024 | 4:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates dp aka dhananjay powar said he will take revenge of varsha usgoankar

Bigg Boss Marathi 5 मध्ये डीपी म्हणजेच धनंजय पोवारचं वर्षा उसगांवकरांना नडणार वक्तव्य

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा खेळ आता सुरू दणक्यात सुरु झाला आहे. पहिल्या काही दिवसांत घरातील स्पर्धक छान मिळून मिसळून राहिल्यानंतर काही दिवसांनी घरचं वातावरणच बदललं आहे. त्यामुळे घरात दोन गट झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर कव पॅडी कांबळे यांचा एक ग्रुप आहे. तर दुसरीकडे निक्की तांबोळी, अरबाज पटेल, घन:श्याम दरवडे, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण यांचा एक ग्रुप आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून घरातील वातावरण पूर्णत: बदललं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

या घरातील डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार त्याच्या खास अंदाजाने सर्वांची मनं जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या कोल्हापूरी अंदाजानं धनंजय पोवार यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. याच जोरावर त्यांची ‘बिग बॉस मराठी’साठी निवड झाली आहे. घरात तणावाचं वातावरण असलं तर डीपी दादा त्यांच्या विनोदी शैलीने ते वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचा हाच स्वभाव वर्षा उसगांवकरांना आवडत नाहीये. याबद्दल डीपी यांच्या मनात खेद असून ही खेद त्यांनी घरातील अंकिता, पॅडी व अभिजीत यांच्याजवळ बोलूनही दाखवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘बिग बॉस मराठी’च्या मंगळवारच्या भागात डीपीने त्यांची खंत व्यक्त केली आहे. बिग बॉस मराठीमध्ये नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा यांनी त्यांच्याच टीममधील सूरज व धनंजय यांना नॉमिनेट केलं. यावेळी अंकिताने वर्षा यांनी धनंजय यांना त्यांच्या पूर्वीच्या रागामुळेच नॉमिनेट केलं असल्याचं म्हटलं. याबद्दल डीपीने असं म्हटलं की, “मी माणसे ओळखतो. त्या बाईच्या (वर्षा उसगांवकर) मनात माझ्याबद्दल भयानक राग आहे. मला त्याची तीव्रता जाणवते”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आधी मैत्री आता अभिजीतविरोधातच अरबाजकडे गॉसिप करतेय निक्की, विरोधात नवा गेम, म्हणाली, “त्याला बघून मी हसते पण…”

यावर अंकिता त्यांना असं म्हणते की. “तुम्हाला माहीत असूनही तुम्ही त्यांची मस्करी का करता?” यावर डीपी असं म्हणतात की, “करणार… रडवणार त्यांना. मी या घरात असेपर्यंत त्यांना मी नडणार”. यावर अंकिता त्यांना असं म्हणते की, “तुम्हाला मागे यावं लागेल”. यावर डीपी असं म्हणतात की, “अजिबात नाही. आता मला कळायला लागलं आहे. त्यामुळे मी नडणार आहे”.

आणखी वाचा – “मुलगा असूनही बाप झालास आणि…”, लेकाने महागडी गाडी गिफ्ट केल्यानंतर प्रसाद ओक भावुक, म्हणाला, “अत्यंत अभिमान…”

दरम्यान, वर्षा यांनी डीपी यांना नॉमिनेट केल्यामुळे अंकिता, पॅडी, अभिजीत, सूरज व आर्या यांच्यात हा संवाद चाललेला असतो की, वर्षा यांनी त्यांच्याच टीममधील लोकांना नॉमिनेट केलं नाही पाहिजे. यामुळे आपली टीम कमजोर होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि हेच म्हणणे त्यांना सांगणे गरजेचे आहे. यावेळी डीपी यांनी वर्षा यांच्याबद्दलची भावना व्यक्त केली.           

Tags: bigg boss marathi 5dhananjay powarvarsha usgoankar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Navri Mile Hitlerla marathi serial fame leela aka vallari viraj bts video she is operating camera and shooting the scenes

Navri Mile Hitlerla च्या सेटवर लीला झाली कॅमेरामन, स्वत:च शूट करत आहे मालिकेतील सीन, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.