Bigg Boss Marathi 5 : सध्या सर्वत्र ‘बिग बॉस’ मराठी’च्या पाचव्या पर्वाची चर्चा सुरु आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून यामध्ये अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाईदेखील पाहायला मिळत आहे.भांडण, हाणामारी, शाब्दिक वादावादी यामुळे या कार्यक्रमाला अधिक रंगत चढलेली आहे. ‘टीम ए’मध्ये आता फूट पडतेय की काय असा प्रश्न पडत आहे. याआधी अभिजीतच्या वागण्यामुळे तो टीमपासून दूर जातोय की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्यानंतर डीपी व अंकिता मध्येही काही कारणामुळे मतभेद झाले होते. अशातच शनिवारच्या भाऊचा धक्कामध्ये पॅडी कांबळे यांना अंकिता व डीपीने त्यांच्याबद्दलची केलेली चुगली ऐकवून दाखवली. (Dhananjay Powar Gossips)
अशातच आता पुन्हा डीपी व अंकिता या भाऊ बहीणीमध्ये काही कारणावरुन मतभेद झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यात अंकिता व डीपी यांच्यात काहीतरी बिनसले असल्याचे दिसत आहे आणि यावरुन डीपी अभिजीत व संग्राम यांच्याबरोबर त्यांच्या नात्याबद्दल गॉसिप करत आहे. याआधी अनेकदा डीपी व अंकिता या बहीण-भावात काही कारणावरुन मतभेद झाले आहेत. पण आताचे मतभेद हे अतिशय टोकाचे असल्याचे डीपीच्या संवादावरुन वाटत आहे. त्यामुळे आता हे मतभेद नक्की कोणत्या कारणावरुन झाले आहे हे कळत नसले तरी त्यांचात काहीतरी गंभीर झाल्याचे वाटत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून वैभवची एक्झिट, ढसाढसा रडला अरबाज, इतर सदस्यांनाही रडू आवरेना
यावेळी अभिजीत डीपीला “अंकिता व तुमच्यात काही बिनसलं आहे का?” असं विचारतो. यावर डीपी असं म्हणतात की, “बस्स झालं. ओढ आहे ती आहे, ते तेवढ्यापर्यंतच राहुदे. मी तिला स्पष्ट सांगितलं आहे की, जिथे मला वाटेल की तू अडचणीत आहेस तिथे मी तुझ्यासाठी उभा राहीन. इतर वेळी माझ्याकडून अपेक्षा करु नको. आता बस्स… पुस्तकाची पाने भरपूर आहेत, पण ती पाठपोट आहेत. तुम्ही फक्त उजव्या बाजूचीच पाणे बघत आहेत. डाव्या बाजूला लिहायचे कष्ट पण घेतले आहेत ना लेखकाने. उजव्या पानावर लिहायला जी मजा येते ती डाव्या पानावर लिहायला येत नाही. याचा अर्थ असा नाही ना की, त्या पानाची किंमत नाही. पण काही काळाने तीच डावी पाणे आपल्याला आवडायला लागतात. कारण त्या पानांवर लिहिताना एक मऊपणा येतो आणि उजव्या बाजूची पाने लिहायला कंटाळा येतो”.
दरम्यान, डीपी व अंकिता यांच्यात एक आगळे वेगळे नाते आहे. यांचे अनेकदा बिग बॉस मराठीच्या घरात दर्शन झाले आहे, हे दोघे चांगले मित्र असले तरी दोघांनी एकमेकांना अनेकदा नॉमिनेट केलं आहे. अशातच गेल्या काही भागात डीपीने त्याला या घरात अंकिता जवळची असल्याचेही म्हटलं आहे. पण आता या दोघांत नक्की काय बिनसलं आहे हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.