Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नियमभंग केल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे शनिवारच्या भाऊचा धक्कावर आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर आर्याने निक्कीला ‘मी तुला मारीन’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला. घरातील इतर सदस्यांनी आर्याच्या हिंसेचं समर्थन केलं नाही, पण तिला तिची चूक समजावण्याचा प्रयत्न केला. (Bigg Boss Marathi 5 Aarya Jadhav Reaction)
निक्कीला मारल्यानंतर आर्याला तिची चूक समजली आणि तिने निक्की, ‘बिग बॉस’सह महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. यानंतर ‘बिग बॉस’ने आर्याला तात्पुरती जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. पण शनिवारी भाऊच्या धक्क्यावर ‘बिग बॉस’ने अंतिम निर्णय जाहीर करत आर्याला घराबाहेर काढलं. आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय प्रेक्षकांना अमान्य आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आर्याने नियमभंग केला असला, तरी अनेक नेटकरी आर्याच्या पाठिशी उभे असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर तिला प्रेक्षकांकडून पाठिंबा मिळत आहे. अशातच आता या प्रकरणी स्वतः आर्याने तिचे मत व्यक्त केलं आहे. यावेळी तिने निक्कीलाअ मारल्याबद्दल स्वत:ची चूक कबूल असल्याचे म्हटलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून वैभवची एक्झिट, ढसाढसा रडला अरबाज, इतर सदस्यांनाही रडू आवरेना
‘बिग चर्चा’ मध्ये आर्या निक्कीला मारल्याबद्दल असं म्हटलं की, “त्या घटनेबद्दल मला इतकंच बोलायचं आहे की, निक्की तर निक्की आहे. ती त्रास देणार, ती काही तरी करणार. पण मी आर्या आहे हे मी विसरायला नको होतं. खलनायक हे खलनायकच असतात, पण आपण त्यांच्यासारखे नाही हे मला कळायला पाहिजे होतं. मी हे असं कृत्य कधीच केलं नाही. कुणावर कधीच हात उचलला नाही पण हे मी काय केलं? मी जे केलं त्याचा स्वीकार करायला मला आणखी वेळ लागेल. जे चूक आहे ते चूकच आहे. तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल कितीही राग असो, त्याने आपल्याबरोबर काहीही केलेलं असो पण एखाद्यावर हात उचलणे हे आर्याने कधीच केलं नसतं. त्यामुळे आता मला मागे वळून त्या घटनेकडे बघताना असं वाटतंय की त्या क्षणी मी आर्या नव्हते”.
दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेताना ‘बिग बॉस’ने “कॅप्टन्सी कार्यातलं फुटेज वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आर्या निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली. निक्कीचा आर्याला धक्का लागला आणि त्यानंतर आर्याने हात उचलला. आर्याने केलंल कृत्य ‘बिग बॉस’च्या मुलभूत नियमांचं उल्लंघन आहे. ‘बिग बॉस’च्या घरात या हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही” असं म्हणत ‘बिग बॉस’ने आर्याला घराबाहेर काढलं आहे.