शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : डीपी व अंकिताच्या नात्यामध्ये फूट, अभिजीतसमोर केलं गॉसिप, म्हणाला, “आता बस्स! माझ्याकडून…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 16, 2024 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates DP aka Dhananjay Powar gossips about Ankita Walawalkar to Abhijeet Sawant

Bigg Boss Marathi 5 च्या घरात डीपी व अंकिताच्या नात्यामध्ये फूट, डीपीने अभिजीतकडे अंकिताबद्दल केलं गॉसिप, नक्की काय म्हणाला?

Bigg Boss Marathi 5 : सध्या सर्वत्र ‘बिग बॉस’ मराठी’च्या पाचव्या पर्वाची चर्चा सुरु आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून यामध्ये अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाईदेखील पाहायला मिळत आहे.भांडण, हाणामारी, शाब्दिक वादावादी यामुळे या कार्यक्रमाला अधिक रंगत चढलेली आहे. ‘टीम ए’मध्ये आता फूट पडतेय की काय असा प्रश्न पडत आहे. याआधी अभिजीतच्या वागण्यामुळे तो टीमपासून दूर जातोय की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्यानंतर डीपी व अंकिता मध्येही काही कारणामुळे मतभेद झाले होते. अशातच शनिवारच्या भाऊचा धक्कामध्ये पॅडी कांबळे यांना अंकिता व डीपीने त्यांच्याबद्दलची केलेली चुगली ऐकवून दाखवली. (Dhananjay Powar Gossips)

अशातच आता पुन्हा डीपी व अंकिता या भाऊ बहीणीमध्ये काही कारणावरुन मतभेद झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यात अंकिता व डीपी यांच्यात काहीतरी बिनसले असल्याचे दिसत आहे आणि यावरुन डीपी अभिजीत व संग्राम यांच्याबरोबर त्यांच्या नात्याबद्दल गॉसिप करत आहे. याआधी अनेकदा डीपी व अंकिता या बहीण-भावात काही कारणावरुन मतभेद झाले आहेत. पण आताचे मतभेद हे अतिशय टोकाचे असल्याचे डीपीच्या संवादावरुन वाटत आहे. त्यामुळे आता हे मतभेद नक्की कोणत्या कारणावरुन झाले आहे हे कळत नसले तरी त्यांचात काहीतरी गंभीर झाल्याचे वाटत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून वैभवची एक्झिट, ढसाढसा रडला अरबाज, इतर सदस्यांनाही रडू आवरेना

यावेळी अभिजीत डीपीला “अंकिता व तुमच्यात काही बिनसलं आहे का?” असं विचारतो. यावर डीपी असं म्हणतात की, “बस्स झालं. ओढ आहे ती आहे, ते तेवढ्यापर्यंतच राहुदे. मी तिला स्पष्ट सांगितलं आहे की, जिथे मला वाटेल की तू अडचणीत आहेस तिथे मी तुझ्यासाठी उभा राहीन. इतर वेळी माझ्याकडून अपेक्षा करु नको. आता बस्स… पुस्तकाची पाने भरपूर आहेत, पण ती पाठपोट आहेत. तुम्ही फक्त उजव्या बाजूचीच पाणे बघत आहेत. डाव्या बाजूला लिहायचे कष्ट पण घेतले आहेत ना लेखकाने. उजव्या पानावर लिहायला जी मजा येते ती डाव्या पानावर लिहायला येत नाही. याचा अर्थ असा नाही ना की, त्या पानाची किंमत नाही. पण काही काळाने तीच डावी पाणे आपल्याला आवडायला लागतात. कारण त्या पानांवर लिहिताना एक मऊपणा येतो आणि उजव्या बाजूची पाने लिहायला कंटाळा येतो”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “कधीच कोणावर हात उचलला नाही पण…”, निक्कीला कानाखाली मारल्यानंतर आर्याचं पहिल्यांदाच वक्तव्य, म्हणाली, “मागे वळून बघताना…”

दरम्यान, डीपी व अंकिता यांच्यात एक आगळे वेगळे नाते आहे. यांचे अनेकदा बिग बॉस मराठीच्या घरात दर्शन  झाले आहे, हे दोघे चांगले मित्र असले तरी दोघांनी एकमेकांना अनेकदा नॉमिनेट केलं आहे. अशातच गेल्या काही भागात डीपीने त्याला या घरात अंकिता जवळची असल्याचेही म्हटलं आहे. पण आता या दोघांत नक्की काय बिनसलं आहे हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.          

Tags: abhijeet sawantankita walawalkardhananjay powar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Ankita Walavalkar Emotional

पहिल्यांदा लेकीसाठी व्यक्त झाले वडील, अंकिता व्हिडीओ पाहून ढसाढसा रडली, म्हणाले, "बोलून दाखवलं नाही पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.