Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्यात घरातील सदस्यांसाठी ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये दोन्ही ग्रुपमध्ये वादावादी झाली. ग्रुप ए मध्येही आपआपसात वाद झाले. तर, दुसरीकडे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने पु्न्हा घरातील इतर सदस्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे यांच्या अभिनयाबाबत आणि करिअरच्या मुद्यावर अपमानास्पद वक्तव्य केलं. ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअर अपमानास्पद वक्तव्य केले. आपल्या ग्रुपचा डाव समोरची टीम उधळून लावत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रुप ए मध्ये चलबिचल सुरू झाली होती. (Bigg Boss Marathi 5 daily updates)
टास्कच्या दरम्यान जान्हवी ही तावातावाने बोलते की, “हे लोक सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाही. यांना फक्त अॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले म्हणून ती अॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.” असे म्हटले होतं. यावर मराठी प्रेक्षकांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक व अभिनेत्री सुरेखा कुडचीने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. सुरेखा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिला याबद्दल बोलले जावे असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुला आताच मारेन”, वैभवची आर्याला धमकी, अंगावर ओरडत राहिला अन्…; हे वागणं शोभतं का?
या पोस्टमध्ये सुरेखा यांनी असं म्हटलं आहे की, “माज आणि माज… कोण आहे ती B टीम भीक आणून देईल म्हणते. कोण आहे ती ती जी डीपीला गेट उघडू का विचारते. कोण आहे ती जी वर्षा वर्षाताईंना म्हणते की तुम्ही चुकलात की तुम्हाला योग्य दिशा दाखवेन. कोण आहे ती जी पंढरीनाथ यांना आयुष्यावर ओव्हर अॅक्टिंग करुन इथेही ओव्हर अॅक्टिंग करायला आलाय म्हणते. काय कर्तुत्व आहे तिचं? कसला माज आहे हा तिचा? ‘बिग बॉस’चा आशीर्वाद आहे का हिला? रितेश भाऊ जरा आवाज वाढवा. आज मी मनापासून मांजरेकरांना मिस करत आहे. ते असते तर त्यांचेच शब्दच असे असते की पुन्हा कुणाला असं बोलायची कुणाची हिंमत झाली नसती. शब्द ऐकूनच चड्डी ओली झाली असती. अशा लोकांना पाठींबा दिला जात आहे. या शनिवारी पाहायचं आहे यावर काही बोललं जातं की, तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं जातंय”.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्क दरम्यान एकाही सदस्याला बीबी करन्सी कमावता आली नाही. त्यामुळे याचे परिणाम या आठवड्यात भोगावे लागतील असा इशारा ‘बिग बॉस’ने दोन्ही टीमला दिला आहे. त्यामुळे आता जान्हवीच्या या वक्तव्यावर आता ‘बिग बॉस’ नेमकं काय करणार, रितेश देशमुख तिला खडेबोल सुनावणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.