Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा कालचा भाग चांगलाच गाजला. दोन्ही ग्रुपच्या सदस्यांना या टास्कमध्ये बीबी करन्सी जमा करता आलेली नाही आणि याचे परिणाम या आठवड्यात भोगावे लागतील असा इशारा ‘बिग बॉस’ने दोन्ही टिमला दिला आहे. तसंच यावेळी ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअर अपमानास्पद वक्तव्य केले. कोणीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका असं रितेशने ‘भाऊच्या धक्क्या’वर स्पष्ट केलं होतं. याआधी निक्कीने वर्षाताईंना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल भाष्य केलं होतं. अशातच जान्हवीची जीभही घसरली आहे. नुकत्याच झालेल्या भागात जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे यांच्या अभिनय व करिअरबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. यावरून आता संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
टास्कच्या दरम्यान जान्हवी ही तावातावाने बोलते की, “हे सगळे लोक घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाही. यांना फक्त अॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले म्हणून ती अॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत”. जान्हवीच्या या वक्तव्यावर मनोरंजन विश्वातून जान्हवीवर संताप व्यक्त केला जात आहे. पॅडी यांना पाठींबा देत जान्हवीबद्दल अनेकांनी आपपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याबद्दल अभिनेता अभिजीत केळकरनेही पोस्ट शेअर करत त्याची बाजू मांडली आहे. अभिजीतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “होय आमचा पॅडी ‘जोकर’च आहे. कुठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा, स्लॅपस्टिकचा हुकमी एक्का, गायन आणि नृत्याच्याही राज्यात सहज मुशाफिरी करणारा हरहुन्नरी, चतुरस्त्र अभिनेता”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “बऱ्या-वाईट परिस्थितीतून, आयुष्यातल्या चढ-उतारांमधून ताऊन सुलाखून निघालेला, पाय घट्ट रोवून उभा असलेला मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि या सगळ्याचा वागण्या-बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला उत्तम आणि संयमी माणूस… पॅडी मित्रा, तुझ्या संयमाला साष्टांग नमस्कार आणि तुला एक जोरदार जादू की झप्पी… मी आत्ताच तुझ्या अंतिम सोहळ्याची AV बघतोय… या पालापाचोळ्याला तू तुझ्या हुशारीने कसं “छू” केलं आहेस. त्यांचं त्यांनाही कळलं नाही. हा संयम ढळू देऊ नकोस आणि काहीही झालं तरी नाराज होऊ नकोस. तू आत भीड, आम्ही तुझ्यासाठी बाहेर आहोतच”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजवर कॅप्टन्सीची टांगती तलवार, स्वत:चा फायदा बघणार की घराचा?, निर्णय ठरणार लक्षवेधी
दरम्यान, तसंच त्याने रितेश व कलर्स मराठी यांचा उल्लेख करत “पॅडीबद्दल जे बोललं गेलं आहे ते ही अक्षम्यच आहे. पॅडी कांबळे व वर्षाताईंनी कदाचित त्यांना माफ केलं असेल. पण आम्ही कधीच करणार नाही”. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्क दरम्यान एकाही सदस्याला बीबी करन्सी कमावता आली नाही. त्यामुळे याचे परिणाम या आठवड्यात भोगावे लागतील असा इशारा बिग बॉसने दोन्ही टीमला दिला आहे. त्यामुळे जान्हवीच्या या वक्तव्यावर आता ‘बिग बॉस’ नेमकं काय करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.