शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “सदस्यांबरोबर विश्वासघात…”, अरबाजच्या बदलेल्या वागणुकीबद्दल अभिजीतकडून कानटोचणी, म्हणाला, “पलटी मारली…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 7, 2024 | 11:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Abhieet Sawant said that Arbaaz Patel betrayed all the members in the house

Bigg Boss Marathi 5 ची घरातील सर्व सदस्यांबरोबर अरबाजने विश्वासघात केला अभिजीतचं वक्तव्य, बदललेल्या वागणुकीबद्दल मांडलं स्पष्ट मत

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेल्या काही भागात सदस्यांमधील अनेक स्थित्यंतरे पाहायला मिळाली आहेत. कुणी क्षणार्धात मित्र  झाले तर कुणी शत्रू. त्यात निक्की व अरबाज यांच्या नावाची तर घरात कायमच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. निक्की व अरबाज यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचं काही दिवसांपूर्वी  पाहायला मिळालं. निक्की व अरबाज यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने टीम एमधील सदस्यांचे व्हिडीओ निक्कीला दाखवल्यानंतर टीम एमध्ये फूट पडली. यामुळे निक्कीने अरबाज, जान्हवी आणि वैभव यांच्या ग्रुपपासून फारकत घेतली. निक्की व अरबाज यांच्यात मोठा राडा झाला, ज्यामध्ये अरबाजने ‘बिग बॉस’च्या घरात तोडफोड केली. यानंतर ‘बिग बॉस’ने अरबाजची कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेतली. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

अभिजीतबरोबरच्या जोडीमुळे अरबाजला निक्कीबरोबरचे वागणं खटकत होते. त्यामुळे त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं, नंतर दोघांनी ते भांडण सोडवलं. तेव्हापासून निक्की व अरबाज परत एकत्र गेम खेळत आहेत. निक्की म्हणेल ते ऐकताना अरबाज दिसत आहे. त्यांचं हेच वागणं घरातील अनेकांना खटकलं. निक्कीपासूनचा विरह अरबाजला सहन न झाल्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी त्याला समजून घेतलं. पण निक्कीबरोबरचे भांडण सोडवल्यानंतर अरबाज घरातील सर्व सदस्यांच्या विरोधात गेला आणि त्याच्या याच वागण्याचा आज भाऊचा धक्क्यावर समाचार घेतला जाणार आहे. आजच्या भागात भाऊचा धक्कामध्ये रितेश अरबाजच्या बदलेल्या वागण्याबद्दल अभिजीतला विचारणार आहे.      

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी तिला बघायचो, ती शायनिंग मारत…”, सूरज चव्हाणने सांगितली त्याची लव्हस्टोरी, म्हणाला, “आमचं वाईला शूट असताना…”

यावेळी अभिजीत त्याचं उत्तर देत असं म्हणतो की, “मला विश्वास होताच की, अरबाज असा फिरणार आहे. त्यामुळे मला खूप वाईटही वाटलं. त्याने इतकी मोठी पलटी मारली हे मला तेव्हा वाटलं नव्हतं. एखादा माणूस आवडतो तर त्याची एक नैसर्गिक पद्धत असते. माणूस हळूहळू बदलतो. अरबाजने बाहेर बसून आमच्याबद्दल असं म्हटलं होतं की, घरातल्यांनी असं काय केलं आहे? त्यांना मी बोललो नव्हतो माझ्याजवळ या किंवा मला मदत करा. तेच लोक माझ्याजवळ आले. त्यामुळे मला वाटतं की, अरबाजकडून हा सर्व सदस्यांबरोबर झालेला विश्वासघात आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या, आर्याचा काढला बाप, प्रेक्षकांनी संस्करांवर निर्माण केलं प्रश्नचिन्ह

यापुढे अभिजीतने असं म्हटलं की, “वैभवने तर निक्कीच्या कॅप्टन्सी रुममध्ये जाऊन तिला ओरडून बोलला होता की तू मला काहीही बोल पण अरबाजला काही बोलू नको. त्याच्याजवळ जाऊ नको. पण अरबाज त्याच्याबरोबरही अगदी क्षणात फिरला. त्यामुळे असा क्षणात फिरणारा माणूस मी कधीच पाहिला नाही”. दरम्यान, आजच्या भाऊचा धक्कामध्ये रितेश अरबाजसह निक्कीच्या वागण्याबद्दलही कान टोचणार आहे. तसंच तिला शिक्षादेखील करणार आहे. तसंच निक्की सोडून आणखी कोणाची शाळा घेतली जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags: Abhieet SawantArbaaz Patelnikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Prasad Limaye Shared Goodnews

'नवरी मिळे हिटलरला' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने ठाण्यात सुरु केलं स्वतःचं हॉटेल, व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव, काय असणार खास?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.