शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “बेशिस्त, फालतू मुलगा”, सूरज चव्हाणच्या ‘त्या’ कृतीनंतर जान्हवी किल्लेकर संतापली, गुलीगत दणका देत म्हणाला, “ए चल निघ…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 6, 2024 | 4:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update suraj chavan and janhavi killekar fight video viral

Bigg Boss Marathi 5 : जान्हवी किल्लेकरने सूरज चव्हाणला म्हटलं फालतू, नवीन प्रोमो चर्चेत

Bigg Boss Marathi Update: ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. आता दुसऱ्या आठवड्यातही बाकी सदस्यांची ‘कल्लाकारी’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते ते सदस्य कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येतील. त्यामुळे ‘बिग बॉस’प्रेमींचं नॉन स्टॉप मनोरंजन होणार आहे. गेल्या आठवड्यात सुरज, पॅडी हे स्पर्धक शांत होते. मात्र यांनी बोलावे असं रितेशने ‘भाऊचा धक्का’मध्ये त्यांना सांगितलं आहे. अशातच सूरजने त्याचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे. (Bigg Boss Marathi Suraj and Janhavi Fight)

‘बिग बॉस’च्या घरात जान्हवी व सूरज यांच्यात बाचाबाची झाली आणि यात सूरज व जान्हवी दोघांना पुरुन उरले. यावेळी सूरज कचऱ्याच्या डब्ब्यात कचरा टाकायला जातो, त्याचवेळी जान्हवीसुद्धा कचरा टाकायला जाते. पण ती कचरा टाकणार इतक्यात सूरज कचऱ्याच्या डब्ब्याचे झाकण लावतो. याचाच जान्हवीला राग येतो आणि त्यांच्यात वाद होतो. यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण होते. यात जान्हवी सूरजच्या वागण्याच्या पध्दतीरुन बोलते.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्राफिकमुळे ऐश्वर्या नारकर त्रस्त, बराच वेळ एकाच जागी, म्हणाल्या, “पैसा, वेळ, शक्ती सगळंच…”

या भांडणादरम्यान, जान्हवी त्याला असं म्हणते की, “तुला काही मॅनर्स आहेत की नाही. अगदी बेशिस्त मुलगा आहेस तू. ही फालतूगिरी इथे नाही दाखवायची. घरी जाऊन दाखव. माझ्या डोळ्यासमोर थांबू नको. इथून निघ”. यानंतर ती अरबाजला घडलेला प्रसंग सांगताना सूरजचा ‘फालतू मुलगा’ आहे असल्याचा उल्लेख करते. पुढे ती त्याला असं म्हणते की, “असल्या फालतू मुद्द्यांवरुन माझ्याशी वाद नाही घालायचे” असं रागात म्हणते. यानंतर सूरज जान्हवीला “ए चल फुट” असं म्हणतो.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada : अधिपतीने चारुहासला काढलं घराबाहेर, हाताने धरुन खेचलं अन्…; अक्षरापासूनही दूर होणार?, पुन्हा वाद

यानंतर जान्हवीही त्याला “ए तू निघ, जास्त शहाणपणा करु नको” असं म्हणते. पुढे “तुला या घराबाहेर कसं काढायचं ते आम्ही बघू” असंही त्याला सुनावते. गोलीगत सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल. दरम्यान, २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांना नुकताच एक आठवडा सुरु झाला असून या पर्वाची सुरुवात भांडण व वादांनी झाली. आता अजून पुढे घरात काय घडणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.                   

Tags: bigg boss marathi 5janhavi killekarSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Satvya Mulichi Satvi Mulgi audience expressed their displeasure over the new twist

"१२-१३ तास कळा सहन करणाऱ्या बायका वेड्या का?", 'सातव्या मुलीची…'चा प्रोमो पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले, "अतिशय फालतू…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.