शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : जान्हवी-निक्कीने जमिनीवर ढकलून खेचताच योगिता भडकली, दोघींशी दोन हात करत बिनधास्त नडली

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 17, 2024 | 3:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update captaincy task Yogita Chavan, Janhvi Killekar and Nikk Tamboli fight for captainship.

Bigg Boss Marathi 5च्या आजच्या भागात रंगणार कॅप्टन्सी टास्क, कोण होणार कॅप्टन, नवीन प्रोमो चर्चेत

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व चांगलेच गाजताना दिसत आहे. ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडनंतर तिसऱ्या आठवड्याची सुरुवात निक्की तांबोळीच्या भांडणाने झालेली पाहायला मिळाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात दररोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला असून या प्रोमोमधून ‘बिग बॉस’च्या घरात आता दुसऱ्या कॅप्टन पदासाठी लढत होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये घरातील सदस्य कॅप्टन पदासाठी एमकमेकांच्या विरुद्ध उभे राहणार आहेत.  (Bigg Boss Marathi 5 daily update)

नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये कॅप्टन पद मिळवण्यासाठी घरातील धाकड गर्ल्समध्ये राडा होणार आहे. जान्हवी, निक्की व योगिता या तीन स्पर्धकांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. या तिघींचा नुकताच आलेला प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या प्रोमोमध्ये निक्की व जान्हवी योगिताकडून फ्रेंच फ्राइज खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या दोघींना योगिता चांगलीच पुरुन उरत असल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “कुत्रीच आहे, हिची औकात…”, आर्याला घाणेरड्या शब्दांत निक्कीने सुनावलं, मर्यादा ओलांडत तिच्या अंगावर पडली अन्…

‘बिग बॉस मराठी ५’च्या कालच्या भागात टीम Aच्या सदस्यांनी टास्क जिंकला होता. त्यामुळे ‘बिग बॉस’ने यामध्ये नवीन ट्विस्ट आणला आणि जिंकलेल्या टीमने कॅप्टन्सी पदासाठी योग्य तो उमेदवार निवडून द्यावा असं सांगितलं. यात बिग बॉसने फ्रेंच फ्राइज तोडायला सांगितलं आहे. त्यामुळे या टास्कमध्ये आता कोण जिंकणार आहे? हे आजच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – 70th National Film Awards : ७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, ‘कांतारा’ चित्रपटाने मारली बाजी, मराठीतील ‘वाळवी’ चित्रपटाला पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

दरम्यान, पहिल्या कॅप्टन्सी टास्कवरुन घरात खूप राडे झाले होते. वर्षा यांच्या पक्षपातीपणामुळे अंकिता कॅप्टन झाल्याचा आरोप निक्की व जान्हवी यांनी केला होता. त्यामुळे आता निक्की व तिची टीम या दुसऱ्या कॅप्टन पदासाठीच्या टास्कमध्ये बाजी मारणार का? योगिता, निक्की व जान्हवी यांपैकी कोण टास्क जिंकणार? हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: bigg boss marathi 5janhavi killekarnikki tamboliYogita Chavhan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 saorabh choghule on yogita chavan

Bigg Boss Marathi : "चला वाट मोकळी करा", निक्की-जान्हवीला बिनधास्त नडल्यानंतर योगिता चव्हाणचा नवरा खूश, आता गेम ऑन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.