सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाईऽऽऽ हा काय प्रकार? सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीही ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेमात, जेवण सोडून शो पाहत बसल्या अन्…; व्हिडीओ व्हायरल  

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 1, 2024 | 1:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka Marathi actresses Kranti Redkar and Sayali Sanjeev watching show in the hotel video viral

हॉटेलमध्ये जेवण सोडून बघत बसल्या बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्का, क्रांती रेडकर व सायली संजीवचा व्हिडीओ व्हायरल

सध्या अत्र तत्र सर्वत्र एकाच शोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे आणि हा लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व सुरु होऊन एक महिना उलटला असून दिवसेंदिवस या खेळातील रंगत वाढत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक प्रेक्षक या शो न चुकता बघत असून सोशल मीडियाद्वारे ही नेटकरी मंडळी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करतानाचे पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीची क्रेझ फक्त प्रेक्षकांमध्येच नसून अनेक कलाकार मंडळींनादेखील हा शो आवडत आहे. याबद्दल अनेक कलाकार मंडळी त्यांची मतं, प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्तही करत आहेत. अशातच दोन मराठी अभिनेत्रींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर व सायली संजीव. (Kranti and Sayali watching Bigg Boss Marathi 5)

मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सायली संजीवचा ‘बिग बॉस मराठी’ पाहतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. क्रांती रेडकर व सायली संजीव या दोन्ही अभिनेत्री काही कामानिमित्त एकत्र बाहेर गेल्या होत्या. यावेळी दोघींनीही चक्क हॉटेलमध्ये बसून, सगळ्या गोष्टी सोडून ‘बिग बॉस मराठी’ चा भाऊचा धक्का हा खास शो पाहण्यास प्राधान्य दिलं. दोघींनी हा भाऊचा धक्का पाहतानाचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – ‘या’ गंभीर दुखापतीमुळे ‘ठरलं तर मग’च्या सायलीवर झाली होती मोठी शस्त्रक्रिया, स्वत:चं खुलासा करत म्हणाली, “एका छोट्याशा अपघातामध्ये…”

क्रांती व सायली या व्हिडीओमध्ये असं म्हणत आहेत की, “आम्ही सगळं सोडून ‘बिग बॉस मराठी’चा ‘भाऊचा धक्का’ बघतोय… तो सुद्धा मोबाइलवर लाइव्ह! आणि आमची टीम सी आहे.” या नंतर दोघी ‘बाई‌‌ऽऽऽ हा काय प्रकार’ हा निक्कीचा लोकप्रिय डायलॉगही म्हणतात. सध्या निक्कीचा ‘बाई‌‌ऽऽऽ हा काय प्रकार’ डायलॉग सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. दहीहंडीमध्येदेखील डीजेवर अनेक ठिकाणी हा डायलॉग प्रेक्षकांना ऐकायला मिळाला. अशातच आता सायली व क्रांती यादेखील निक्कीच्या या डायलॉगच्या व बिग बॉस मराठीची प्रेमात पडल्या आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “घन:श्यामबरोबर केलं तेच जर…”, ‘त्या’ कृतीबद्दल रितेशने अंकिता वालावलकरला चांगलंच झापलं, म्हणाला, “फार चुकीचं…”

दरम्यान, क्रांती व सायली यांनी एका कार्यक्रमाला एकत्र हजेरी लावल्यानंतर एकेठिकाणी बिग बॉस मराठीचा आनंद घेतला. या व्हिडीओमध्ये दोघांनी भरजरी साड्या नेसलयाचे पाहायला मिळत आहे. सायलीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर क्रांतीने वांगी रंगाची साडी परिधान केली आहे. दोघीही या व्हिडीओमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार व नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

Tags: bigg boss marathi 5kranti redkarsayali sanjeev
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Gauahar Khan on suniel Shetty
Women

“सी-सेक्शन म्हणजे आराम”, सुनिल शेट्टींच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “अनुभवलं नाही मग बोलले कसे?”

जून 2, 2025 | 2:51 pm
 Heeramandi Actress Sharmin Segal
Entertainment

‘हिरामंडी’ फेम अभिनेत्री झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, कुटुंबात जंगी सेलिब्रेशन

जून 2, 2025 | 2:07 pm
Next Post
deepika paudkone delivery date

दीपिका पदूकोण सप्टेंबर महिन्यात ‘या’ दिवशी बाळाला देणार जन्म? तारीख आली समोर, एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरबरोबर आहे खास कनेक्शन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.