शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्की-अभिजीत यांच्यातील जवळीक अरबाजला खटकली, असुरक्षित वाटत असल्याचे दिलं कारण, म्हणाली, “त्याच्याबरोबर…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 23, 2024 | 11:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Arbaaz daily update feels insecure for Nikki Tamboli and Abhieet Sawant friendship video viral on social media

Bigg Boss Marathi 5 मध्ये निक्की-अभिजीत यांच्यातील मैत्रीचा अरबाजला होतोय त्रास, टीम्समध्ये फुट पडणार का?

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या ‘टीम ए’ आणि ‘टीम बी’ अशा दोन टीम तयार झाल्या आहेत. असं असलं तरी, ‘टीम ए’मधील निक्की व ‘टीम बी’मधील अभिजीत सावंत या दोघांची चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. या टीम एकमेकांच्या विरोधात असले, एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी निक्की व अभिजीत यांची मैत्री काही कारणामुळे अरबाजला खटकत असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं. अरबाजचं नव्हे तर अभिजीतच्या टीम ‘बी’मधील सदस्यांनाही या मैत्रीवर आक्षेप असल्याचं दिसत आहे. याबद्दल टीम ‘बी’च्या स्पर्धकांनीनी अनेकदा उघडउघड भाष्य केलं आहे. अशातच नवीन प्रोमोमधूनही आता निक्की-अभिजीतची मैत्री अरबाजलं सहन होत नसल्याचे दिसत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता अभिजीतमुळे निक्की-अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे. निक्की-अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. निक्की-अभिजीत यांच्यातील अरबाजबद्दलच्या संवादाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आता मी याला भिडणार”, निक्की-अभिजीतची मैत्री अरबाजला सहन होईना, दोघांमुळे टीममध्ये फूट पडणार?

या व्हिडीओमध्ये निक्की, अभिजीत व वर्षा उसगांवकर घरातील गार्डन एरियामध्ये बसलेले असताना अरबाजबद्दल बोलतात. यावेळी अभिजीत निक्कीशी अरबाजबद्दल असं म्हणतो की, “हे काय आहे. हे खूपच अति होत आहे. हे अगदी कॉलेजच्या मुलांसारखं होत आहे. कॉलेजमधली मुलं म्हणतात “देखा उसने भी मुझे देखा. तेरी बंदी भी स्माईल करती है. तसं झालं आहे”. यावर वर्षाताई निक्कीला “अरबाजला तुझ्याबद्दल असुरक्षितता वाटत आहे का?” असं विचारतात. यावर निक्की त्यांना असं म्हणते की, “नाही. तसं काही नाही. त्याचं म्हणणं हे आहे की, आम्ही (टीम ए) अभिजीतच्या विरुद्ध आहोत तर तू का बोलतेय? आणि सगळे अभिजीतविरुद्ध आहेत कारण अभिजीतला मला fevour करत नाही. मग तू का त्याच्याबरोबर बोलते”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पार पडला नवीन नॉमिनेशन टास्क, ‘या’ चार स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार? कोण जाणार घराबाहेर?  

दरम्यान, निक्की-अभिजीतच्या मैत्रीमुळे आता निक्की-अरबाज दुरावणार का? असा प्रश्न पडला आहे. तसंच अभिजीतही त्याच्या टीमपासून वेगळा होणार? का? आणि अभिजीत-निक्कीची मैत्री अरबाजसह आणखी कोणाला खटकणार का?  त्याचबरोबर या मैत्रीमुळे घरातील वातावरण कसं राहणार? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: abhijeet sawantArbaaz PatelBoss Marathi 5nikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo Nikki Tamboli and Vaibhav Chavan fight for Irina Rudakova in

Bigg Boss Marathi : "तुझी बोटं तोंडात घाल", इरिनावर निक्कीने राग काढताच वैभव भडकला, भांडणात लाथेने भांडी उडवली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.