मराठी सिनेसृष्टीतील नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. सध्या ऐश्वर्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजवर ऐश्वर्या यांनी अनेक मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. वयाची पन्नाशी गाठलेल्या या अभिनेत्रीचं सौंदर्य एखाद्या तरुणाईला लाजवेल असं आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. (Aishwarya Narkar Angry)
ऐश्वर्या या नेहमीच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन रील व्हिडीओ पोस्ट करत असतात. ऐश्वर्या यांचे डान्स व्हिडीओ मिलियन व्ह्यूजच्या घरात जातात. लाखो प्रेक्षकांची या व्हिडीओला पसंती असली तरी त्यांचे हटके व्हिडीओ पाहून अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. बरेचदा ऐश्वर्या या ट्रोलींगवर भाष्य करताना दिसतात. सडेतोड उत्तर देत त्यांनी अनेकांची तोंडही बंद केली आहेत. अनेकदा ऐश्वर्या या अविनाश नारकर यांच्याबरोबर रील व्हिडीओ पोस्ट करत असतात. या व्हिडीओवर त्यांना अनेकदा नकारात्मक कमेंट्स येतात, अशातच त्यांच्या एका डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

ऐश्वर्या नारकरांनी नुकताच इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी नेटकऱ्याने अभिनेत्रीला सुरुवातीच्या दिवसात काहीसे बरे मॅसेज केले. पण त्यानंतर काही आक्षेपार्ह मेसेज करत हे चित्र बदललं. या सगळ्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे. यातील एका मेसेजमध्ये “तुम्ही आता म्हाताऱ्या झालात”, “विषारी”, “१० पोरांची अशक्त आई”, असं देखील म्हटलेलं दिसत आहे. याचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्रीने नेटकऱ्याला खडेबोल सुनावले आहेत.
आणखी वाचा – “मुलीची आई कोण आहे?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर करण जोहरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “खूप त्रास झाला आणि…”
“प्रवास बघा आपला. डोक्यावर आपटत गेलात की काय. आपली लायकी काय, आपण बोलतो काय” असं म्हणत ऐश्वर्या नारकरांनी या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. तसेच या पोस्टबरोबर अभिनेत्रीने आक्षेपार्ह मेसेज केल्याचं संपूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग देखील शेअर केलं आहे.