शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss च्या घरात अनिल थत्तेंची जोरदार एन्ट्री, निक्कीमुळेच शो चालत असल्याचा केला दावा, वर्षा उसगांवरांना बघताच म्हणाले…

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 28, 2024 | 4:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 After Rakhi Sawant, Abhijeet Bichukale, ex contestant Anil Thatte also enter in the house

Bigg Boss Marathi 5 मध्ये राखी सावंत, अभिजीत बिचुकले यांच्या पाठोपाठ आता पत्रकार अनिल थत्ते यांचीही एन्ट्री होणार आहे

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर या आठ सदस्यांमधील एक जण यंदाच्या पर्वाचा विजेता होणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस मराठी’कडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आजच्या भागात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेल्या पर्वातील काही स्पर्धकांचा समावेश होणार आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर या सदस्यांबद्दलचे काही खास प्रोमो शेअर करण्यात आले आहेत.

राखी सावंत, अभिजीत बिचुकले यांच्या पाठोपाठ आता घरात पत्रकार अनिल थत्ते यांचीही एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीने नुकताच अनिल यांच्या एन्ट्रीचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. त्यांची ही डॅशिंग एन्ट्री सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनिल थत्ते यांची घरात एन्ट्री होताच त्या वर्षा यांना असं म्हणतात की, “मी तुम्हाला ताई म्हणणार नाही, कारण ती तरुणपणाची ड्रीमगर्ल आहे”. यापुढे ते निक्कीबद्दल असं म्हणतात की, “तू युनिक आहेस. तुझ्याशिवाय आम्ही ‘बिग बॉस’ची कल्पना करु शकत नाही”.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – व्यवसाय करत नवऱ्याला दिली साथ, काही वर्ष डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय अन्…; अभिजीत सावंतने सांगितली लव्हस्टोरी

अनिल यांचा हा नवीन प्रोमो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला होता. या स्पर्धकांमध्ये अनेक मराठी कलाकार होते पण एक चेहरा लक्षवेधी ठरला तो म्हणजे अनिल थत्ते यांचा. त्यांच्या आगळ्यावेगळ्या वेशभुषेमुळे अनिल थत्ते नेमके कोण आहेत? याबद्दल लोकांची उत्सुक्ता जागृत झाली. अनिल थत्ते त्यांच्या या हौशेला फक्त एकच कारण आहे ते म्हणजे लोकांनी त्यांच्याकडे पाहणे आणि हे ते स्वतःच कबुल करतात. 

आणखी वाचा – मराठी मालिकेमध्ये इरीनाची एण्ट्री, प्रोमोमधील डायलॉगने वेधलं लक्ष, म्हणाली, “राम कृष्ण हरी”

अनिल थत्ते यांचे ज्योतिषीय विश्वात मोठे आहे पण फार कमी जणांना माहीत आहे की, अनिल हे याअगोदर पत्रकार होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात ते गगनभेदी नावाचे मराठी पब्लिकेशन चालवत असत. यात स्कँडलपासून ते अश्लील जोक्सपर्य़ंत सर्वकाही असत. त्यानंतर त्यांनी बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला आणि ते आणखी प्रसिद्धी झोतात आले. अशातच त्यांनी पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे.  

Tags: Anil Thattebigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Entertainment News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
jennifer mistry bansiwal on palak sidhwani

"मालिकाच एक तुरुंग", 'तारक मेहता…'वर मिसेस सोढीचे पुन्हा आरोप, 'सोनू'ला निर्मात्यांनी त्रास देताच म्हणाली, "मलाही पैसे मिळाले नाहीत आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.