शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi चा विजेता अभिजीत सावंतच असणार?, बॉलिवूडकरांचा मोठा पाठिंबा, म्हणाले, “तोच जिंकावा आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 5, 2024 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 9 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Abhijeet Sawant Sunil Grover, Chunky Pandey, Rahul Vaidya, Akash Aziz, Salim Merchant, Farah Khan support

सुनील ग्रोव्हर, चंकी पांडे, राहुल वैद्य, आकाश अझीज, सलीम मर्चंट, फराह खान यांनी बिग बॉस मराठी ५ फेम अभिजीत सावंतला पाठिंबा दिला आहे

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधील प्रत्येक स्पर्धकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अगदी उद्यावर या सीझनचा महाअंतिम सोहळा येऊन पोहोचला आहे. या सीझनमध्ये अनेकांनी सहभाग घेतला होता आणि यापैकी चर्चेतलं नाव म्हणजे अभिजीत सावंत. छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडॉल’चा विजेता असलेल्या अभिजीत सावंतने सुरेल आवाजाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील त्याचा खेळ पाहून प्रेक्षक त्याच्या जिद्दीचं आणि चिकाटीचं कौतुक करत आहेत. अशातच बॉलिवूडसह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनीदेखील अभिजीतच्या खेळाचे कौतुक केलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Abhijeet Sawant)

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला आता सुरुवात झाली आहे. यंदाचं पर्व शंभर दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरात एकूण ७ सदस्य आहेत. घरातील आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी सर्वजण प्रेक्षकांना आवाहन करत आहेत. यामध्ये अभिजीतच्या अनेक मित्रमंडळींनी त्याला खास व्हिडीओ शेअर करत पाठिंबा दिला आहे. यामध्ये ‘कपिल शर्मा शो’ फेम सुनील ग्रोव्हर, बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे, गायक राहुल वैद्य व आकाश अझीज, संगीतकार सलीम मर्चंट, फराह खान यांनी पाठिंबा दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

View this post on Instagram

A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

तसंच मराठी अभिनेत्री व ‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक मीरा जगन्नाथ, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अथर्व सुदामे यांनीही व्हिडीओ शेअर करत अभिजीला पाठिंबा दिला आहे. “आपल्या सर्वांचा लाडका अभिजीत सावंत आता ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे त्याला जिंकवण्यासाठी तुम्ही  सर्वांनी भरभरून मत करा आणि त्याला जिंकवून द्या” अशा आशयाचे व्हिडीओ शेअर करत सर्वांनी अभिजीतला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

View this post on Instagram

A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

७० दिवस प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यावर ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी ६ ऑक्टोबर रोजी या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. दोन आठवड्यांपासून गैरहजर असलेला होस्ट रितेश देशमुख या सोहळ्याला हजर असणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ब्लॉकबस्टर पाचव्या पर्वाच्या विजेतेपदाची ट्रॉफी कोणता सदस्य उचलणार हे रविवारी स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या चाहते या महाअंतिम सोहळ्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

Tags: Abhijeet Sawant Supportbigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 arya jadhav missing

Bigg Boss Marathi चे सगळे सदस्य पुन्हा एकत्र, आर्या नसल्यामुळे प्रेक्षकांनी विचारला जाब, म्हणाले, "नको ते चाळे दाखवता पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.