शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सूरज चव्हाणचं नशिब उजळलं, Bigg Boss Marathi नंतर मराठी चित्रपटामध्ये दिसणार, पोस्टर प्रदर्शित

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 22, 2024 | 1:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Suraj Chavan will soon be seen in the movie named as Rajarani know more details

Bigg Boss Marathi 5 फेम सूरज चव्हाणचा गोलीगत दणका, 'राजाराणी' चित्रपटातून गाजवणार मोठा पडदा

Bigg Boss Marathi 5 fame Suraj Chavan : ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे सूरज चव्हाण. टीकटॉक स्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात येताच, अनेकांनी टीका केली. पण जेव्हा को घरात आला, तेव्हा त्याला बोलणंही येत नव्हतं. पण आता हळहळू त्याला गेम कळायला लागला असून तो प्रत्येक खेळात सहभागी होत आहे. पहिल्या दिवशी टीका करणाऱ्यांनाही आता सूरजला पाठिंबा दिला आहे. आधी ट्रोल केलं, पण त्याच लोकांनी सूरजसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याचं दिसून येत आहे.त्याला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळताना दिसत आहे. अशातच आता सूरज मोठ्या पडद्यावरदेखील झळकण्यास सज्ज होणार आहे. (Bigg Boss Marathi 5 Fame Suraj Chavan Movie)

छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने झगमगाटीच्या दुनियेत स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं. सध्या ‘बिग बॉस मराठी’ मुळे सूरज भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. अशातच आता सूरज त्याच्या आगामी ‘राजाराणी’ या चित्रपटातून मोठा पडदा गाजवणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मन जिंकली. सूरज आता सत्य घटनेवर आधारित उलगडणार्‍या या प्रेम कथेतून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सूरज असणार आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील व वैष्णवी शिंदे ही कलाकार मंडळी दिसणार आहेत. तर चित्रपटातील रोहनच्या मित्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत सूरज दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोदावरी’ची बाजी, शिवाजी साटम, रोहिणी हट्टंगडी, अनुराधा पौडवाल यांचा गौरव

या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आता बिग बॉसमध्ये हवा करणारा सूरज त्याच्या आगामी ‘राजा राणी’ चित्रपटात काय जादू करणार?. त्याची भूमिका नेमकी कशी असणार? बिग बॉस प्रमाणेच तो त्याच्या या चित्रपटातील भूमिकेतूनही प्रेक्षकांचे मन जिंकणार का? हे येत्या काळात प्रेक्षकांसमोर येईलच. त्यामुळे लवकरच सूरजला मोठ्या पडद्यावर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहणं फारच रंजक ठरणार आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “बोलत नाही तर गरिबांचा फायदा घेतात”, सूरज चव्हाण थेट भिडणार, अभिजीत-आर्याला म्हणाला, “तू नड आता…”

दरम्यान, ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. तसंच संगीत दिग्दर्शन पी. शंकरम व पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे यांनी केलं आहे. सूरजचा ‘राजाराणी’ हा चित्रपट येतया १८ ऑक्टोबर २०२४ पासून जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 fame Suraj Chavan NewsSuraj Chavan New Movie
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi : "रंग माझा वेगळाचा एपिसोड दुसऱ्याच शोमध्ये झाला", मराठी अभिनेत्रीचा जान्हवीला सणसणीत टोला, पॅडीची माफी मागितली म्हणून…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.