सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’चं घर स्पर्धकांसाठी बंद! पहिल्याच दिवशी घरामध्ये तुफान, नेमकं काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 12, 2026 | 12:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6 Update

'बिग बॉस'च्या घरात पहिल्याच दिवशी तुफान

Bigg Boss Marathi 6 Update : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६चा ग्रँड प्रीमियर मोठ्या दणक्यात पार पडला. ‘बिग बॉस’ मराठीचं पाचवं पर्व गाजल्यानंतर यंदाच्या पर्वात कल्ला करायला कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष होतं. यावेळी या शोमध्ये स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याचे उत्तर नुकत्याच पार पडलेल्या प्रीमियरमध्ये मिळालं. तर यंदा स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात एंट्री करण्यासाठी दोन पर्याय ठेवले होते. एक शॉर्टकटचं दार तर दुसरं कष्टाचं दार प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या आवडीनुसार पर्याय निवडले आणि घरात एन्ट्री घेतली.

आणखी वाचा: लोकप्रिय अभिनेत्री करणार अरेंज मॅरेज; रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज; व्हिडीओ शेअर करत म्हणाली; “स्पेशल सरप्राईज…”

नुकताच ‘बिग बॉस’ मराठीचा पहिला प्रोमो समोर आला. ज्यामध्ये घरात पहिल्याच दिवशी तुफान आल्याचं पाहायला मिळालं. मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवलेला बझर वेळेत वाजवण्याचा आदेश बिग बॉसने दिलेला असतो, पण एकाही स्पर्धकाने तो बझर वाजवलेला नसतो. वेळ संपल्यानंतर ‘बिग बॉस’ स्पर्धकांना सांगतात की, कोणीच बझर वाजवून तुफान थांबवला नाही, त्यामुळे घर आता सर्वांसाठी बंद होत आहे. सगळ्या स्पर्धकांच्या डोळ्यांदेखत ‘बिग बॉसचं” घर बंद केलं जातं. पहिल्याच दिवशी घर बंद झाल्याने स्पर्धकांना मोठा धक्का बसतो. आता पहिल्याच दिवशी घर बंद झाल्यानंतर स्पर्धक पुढे काय करणार, ‘बिग बॉस’ मराठीचा पुढचा ट्विस्ट काय असेल?, हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6 Update)

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. तर यंदाच्या सीझनमध्ये राकेश बापट, अनुश्री माने, ओमकार राऊत, विशाल कोटीयन, रोशन भजनकर, दिव्या शिंदे, राधा पाटील, प्राजक्ता शुक्रे, रुचिता जामदार, दिपाली सय्यद, करण सोनावणे, प्रभु शेळके, सोनाली राऊत, तन्वी कोलते, आयुष संजीव, सागर कारंडे या स्पर्धकांनी ‘बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचं नशीब कसं पालटणार, त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात हे स्पर्धक काय धुमाकूळ घालणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर ‘बिग बॉस मराठी ६’ दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर नक्की पाहा. (Bigg Boss Marathi 6 Update)

आणखी वाचा: “ते वळण पाहून छातीत धस्स झालं…” घोडबंदर अपघातात थोडक्यात वाचला मराठी अभिनेता; पोस्ट शेअर करत म्हणाला, “अपघातात तिथे पार चेंगरून…”

Tags: Bigg Boss Marathi 6Bigg Boss Marathi 6 Updateentertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Bigg Boss Marathi 6 Update

"बिनडोक, तुझं तोंड…"; पहिल्याच दिवशी तन्वी आणि रुचितामध्ये वाद, रुचिताचं तन्वीला सडेतोड उत्तर, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.