Bigg Boss Hindi 18 Grand Premiere Updates : टेलिव्हीजनवरील लाडका कार्यक्रम ‘बिग बॉस’चं १८ वं पर्व सुरु झालं आहे. प्रत्येक पर्वाप्रमाणे हे पर्वदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. म यामध्ये सलमान खानच्या हटके अंदाजाने लक्ष वेधून घेतले. त्याने हा प्रोमो स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल वरुन शेअर केला होता. त्यामुळे नक्कीच यामध्ये काहीतरी खास असणार यांचा अंदाज बिग बॉसच्या चाहत्यांनी बांधलाच होता. आज या कार्यक्रमाची ग्रँड सुरुवातदेखील पाहायला मिळत आहे. यामध्ये कोणकोणते सदस्य सहभागी झाले आहेत याची उत्सुकता चाहत्यांना लागली असून आता एक-एक सदस्य समोर येताना दिसत आहे.
सध्या पहिल्या सदस्याची एंट्री झाली असून ही एक टेलिव्हीजन अभिनेत्री आहे. चाहत पांडेची धमाकेदार एंट्री झाली आहे. चाहतने आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत. एंट्रीच्या वेळी तिने ‘प्रेम रतन धन पायो’ या गाण्यावर डान्स केला. तसेच तिने सुंदर असा पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. चाहत मूळची मध्यप्रदेशमधील जबलपूर येथील आहे. चाहतनंतर घरामध्ये दुसऱ्या सदस्याची एंट्री झाली आहे. दुसऱ्या सदस्याची एंट्री झाली असून त्याचं नाव शाहजादा धामी आहे. आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या हटके अंदाजामुळे तो नेहमीच चर्चेत असलेला पाहायला मिळतो. आता ‘बिग बॉस’मध्ये तो काय करणार हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
त्यानंतर तिसऱ्या सदस्याची एंट्रीदेखील झाली आहे. त्याचं नाव अविनाश मिश्रा असून तो एक टेलिव्हीजन अभिनेता आहे. त्याने तितली, मीठा खट्टा प्यार, सेठजी या मालिकांमध्ये दिसून आला आहे. त्यांतर चौथ्या सदस्यानेदेखील घरात प्रवेश केला आहे. ही सदस्य म्हणजे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर. शिल्पा यांनी आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. आता त्या ‘बिग बॉस’ काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अशातच आता घरातील स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. तसेच पुढील १०० दिवस प्रेक्षकांचे मनोरंजनदेखील होणार आहे. दर आठवड्याला सलमान खान सदस्यांची शाळा घेतानादेखील पाहायला मिळणार आहे. आता बिग बॉसमध्ये कोण वरचढ ठरणार? कोणाचा खेळ भारी असणार आणि कोण कोणाला मात देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.