गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ नंतर शिव ठाकरे झळकणार ‘या’ रिॲलिटी शोमध्ये, प्रोमो चर्चेत

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 19, 2023 | 10:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiv Thakare in Jhalak Dikhhla Jaa 11

'बिग बॉस', 'खतरों के खिलाडी' नंतर शिव ठाकरे झळकणार 'या' रिॲलिटी शोमध्ये, प्रोमो चर्चेत

मराठीसह हिंदी टीव्ही विश्वातील एक चर्चेतला चेहरा म्हणजे शिव ठाकरे. ‘रोडीज’ या हिंदी शोमधून शिव घराघरात पोहोचला. पुढे तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला, ज्यात तो विजेता ठरला होता. तो केवळ इथपर्यंत थांबला नाही, तर हिंदी ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमात सहभागी होत त्याने आपला दमदार खेळ दाखवला. ज्यामुळे त्याचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला. या सर्व शोजमुळे त्याला ‘आपला माणूस’ अशी नवी ओळख मिळाली. टीव्ही विश्वातील या मराठमोळा चेहऱ्याने अनेक रिॲलिटी शोज गाजवल्यानंतर आता आणखी एका शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Shiv Thakare in Jhalak Dikhhla Jaa 11)

मॉडेल व अभिनेता शिव ठाकरे लवकरच लोकप्रिय डान्स रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा’च्या ११व्या पर्वात सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. नुकताच वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याचा एक झलक दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आपला चेहरा झाकला आहे. पण चाहते त्याच्या लूकवरून तो शिव ठाकरे असल्याचा अंदाज लावत आहे. त्यामुळे, या पर्वात शिव सहभागी होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा – अक्षया देवधरला नवऱ्याने दिलं मोठं सरप्राइज, आयफोन गिफ्ट केल्यानंतर अभिनेत्री म्हणते, “आयफोन लव्हरच…”

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

मॉडेलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी शिवने कोरिओग्राफर म्हणून त्याच्या करिअरला सुरूवात केली होती. त्याने अनेक कलाकारांना कोरिओग्राफ केलेलं आहे. शिवाय, अमरावतीत स्वतःचा डान्स स्टुडिओ देखील आहे. त्यामुळे चाहते अभिनेत्याला या रूपात पाहण्यासाठी आतुरलेले आहेत. येत्या ११ नोव्हेंबरपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: bigg boss marathishiv thakareShiv Thakare in Jhalak Dikhhla Jaa 11
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Sneha Chavan look after Aniket Vishwasrao divorce

लग्नाच्या दोन वर्षांमध्येच घटस्फोट, नवऱ्यावर मारहाणीचा आरोप अन्…; आता मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण, लूक बदलला आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.