बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अभिनेत्री नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. सध्या तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट खूप चर्चेत आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला तिचा चित्रपट येत्या १७ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र आता ती तिच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने आता ‘ऑस्कर पुरस्कार’वर निशाणा साधला आहे. तीने या पुरस्काराला भारतविरोधी असल्याचे सांगितले आहे. ती ऑस्कर पुरस्काराविषयी नक्की काय म्हणाली? ते आपण आता सविस्तररित्या जाणून घेऊया. (kangana on oscar awards)
ऑस्करबद्दल कंगना म्हणाली की, “ऑस्करसाठी फक्त असेच चित्रपट निवडले जातात ज्यामध्ये भारतातील घाण दाखवली जाते. सहसा भारतासाठी जो अजेंडा आहे तो सांगतात मात्र तो खूप वेगळा असलेले दिसून येते. जो चित्रपट ऑस्करसाठी निवडला जातो तो भारताविरोधी असतो”.
पुढे ती म्हणाली की, “आता ज्या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे त्याबद्दल मी खूप उत्साही आहे. पण मी दिग्दर्शकाला हे म्हणताना ऐकलं की भारतात धार्मिक असहिष्णुता असल्याने तुम्हाला प्रेम करण्याचे स्वातंत्र्य नाही. मी चित्रपट बघितला नाही. पण मला वाटतं की ऑस्करमध्ये असा चित्रपट असावा ज्यामध्ये भारत खूप खराब दाखवलेला असेल. ‘स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट तसाच होता. ज्यामध्ये देश घाण दाखवला जातो अशाच चित्रपटांची निवड ऑस्करसाठी होते”.
नंतर ती म्हणाली की, “माझा चित्रपट ‘इमर्जन्सी’मध्ये तसं काही नाही. यामध्ये देशाबद्दल काहीही खराब दाखवलं नाही. भारत आज कोणत्या स्थितीमध्ये आहे हे बघण्यासाठी पाश्चमात्य देश उत्साही आहेत. मला या पुसकारांशी काहीही देण-घेणं नाही. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट खूप सुंदररित्या बनवला आहे. आम्ही या पुरस्कारांकडून जास्त अपेक्षा ठेवत नाही”. दरम्यान आता कंगनाचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.