Bigg Boss 18 : सलमान खानचा वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ खूप चर्चेत आहे, जिथे कधी घरातील सदस्यांमध्ये जोरदार भांडण होते तर कधी त्यांच्यात हशा पिकतो. बिग बॉसच्या घरात अनेकांना अनेकांवर प्रेम झाले आहे. यापैकी काहींचे प्रेम यशस्वी झाले आहे तर काहींचे या शोमध्ये किंवा शोमधून बाहेर पडताच प्रेम संपले आहे. अशातच ‘बिग बॉस १८’ घरातील सदस्यांमधील सततच्या वादानंतर आता काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस १८’ मध्ये आता एक नवीन प्रेम कहाणी फुलणार आहे. ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांच्यात काहीतरी घडणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss 18 Esha and Avinash Love Story)
‘बिग बॉस’मध्ये नुकतेच सलमान खानने चाहत पांडेला विचारलं की “तिला कसा मुलगा आवडतो?” ज्यावर चाहतने उत्तर दिलं की “तिला करणवीर मेहरासारखा मुलगा आवडतो”. यानंतर त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात होऊ शकते अशी बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. अशातच एलिस कौशिकने ईशा सिंगला अविनाश मिश्राविषयी भावना असल्याचं सांगून घरात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्यातील संभाषणादरम्यान, एलिस अविनाशला सांगते की तिला त्याच्या आणि ईशामध्ये काहीतरी वाटत आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : प्रेम बहरता बहरता एजे-लीलामध्ये होणार गैरसमज, नात्यात पुन्हा दुरावा येणार
एलिस “ईशा तुला आवडते का? असं म्हणत अविनाशला चिडवते. एलिसने हे सांगताच तिघांमध्ये चर्चा सुरू झाली. नंतर ईशा अविनाशला विचारते की, “एलिस काय म्हणाली?”. यावर अविनाश सांगतो की, “एलिसने ईशाबद्दल सांगितले पण ती मस्करी होती”. तेव्हा ईशा म्हणते की, “मी तुला सांगते. मी तुला खूप चांगला मित्र मानते. मला या सर्व गोष्टीचा तिरस्कार आहे आणि ते बिघडवण्याचा माझा हेतू नाही”. यावर अविनाशने तिला सांगितले की, “एलिस मस्करी करत होती”.
आणखी वाचा – वडील झाल्यानंतर प्रिन्स नरुलाचा आनंद गगनात मावेना, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, एकटक बघतच बसला अन्…
दरम्यान, ‘बिग बॉस १८’च्या नुकत्याच झालेल्या भागात घरातील सदस्यांशी भांडण झाल्यानंतर ‘बिग बॉस’ अविनाश मिश्राला तुरुंगात टाकतात. तसंच कुटुंबातील सदस्यांना किती राशन द्यायचे हे ते ठरवू शकतात असा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. यानंतर अविनाश मिश्रा म्हणाला की, “जोपर्यंत करणवीर मेहरा त्यांची माफी मागत नाही तोपर्यंत कुटुंबीयांना राशन देणार नाही”. कुटुंबातील सदस्यांमधील या वादांमध्ये आता नवीन प्रेमकहाणी सुरू होते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.