प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी यांनी लग्नाच्या ६ वर्षानंतर आई-बाबा होणार असल्याची खुशखबर सांगितली होती. ७ ऑगस्ट २०२४ रोजी युविकाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. अशातच २० ऑक्टोबर रोजी त्यांनी एका चिमुकलीला जन्म दिला. युविका गरोदर असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वी शेअर केली होती. त्यानंतर आता त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, प्रिन्सचे वडील जोगिंदर नरुला यांनी दोघांच्या मुलीच्या जन्माबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी “होय, आमच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत” अशी प्रतिक्रिया दिली. (Prince Narula and Yuvika Chaudhary Daughter)
लग्नानंतर सहा वर्षांनी प्रिन्स व युविका यांनी एका मुलीला जन्म दिला असून या चिमुकलीच्या आगमनामुळे त्यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच त्यांनी आपल्या लेकीची पहिली झलक शेअर केली आहे. प्रिन्स व नरुला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये हे जोडपे हॉस्पिटलच्या खोलीत बसलेले दिसत असून मांडीवर त्यांची कन्या आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : प्रेम बहरता बहरता एजे-लीलामध्ये होणार गैरसमज, नात्यात पुन्हा दुरावा येणार
या फोटोमध्ये प्रिन्स व युविका यांनी आपल्या लेकीचा चेहरा लपवला असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये युविका हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर प्रिन्स कॅज्युअल लूकमध्ये आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये आई-वडील झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांकडून व कलाकारांकडून लाईक्स व कमेंट्सद्वारेही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा – ‘आहट’ हॉरर शो आता मराठीत, सोनी मराठीकडून घोषणा, २० वर्षांनी पुन्हा एकदा पसरणार भीतीचे सावट
दरम्यान, युविका चौधरी व प्रिन्स नरुला यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली होती. हे जोडपे ‘बिग बॉस ९’ मध्ये भेटले होते. या शोमधूनच त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेम निर्माण झाले. या जोडप्याने २०१६ मध्ये साखरपुडा केला होता. यानंतर त्यांनी दोन वर्षांनी २०१८ मध्ये लग्न केले. मोठ्या थाटामाटात त्यांचे लग्न पार पडले आणि त्याची बरीच चर्चा झाली. अशातच लग्नाच्या सहा वर्षांनी या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.