शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

 गुहेसारख्या खोल्या, घराला किल्ल्यासारखा टच, १०७ कॅमेरे अन्…; Bigg Boss 18 च्या घराची पहिली झलक, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 5, 2024 | 12:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 Bigg Boss 18 House Photo

 Bigg Boss 18 House Photo : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा १८वा सीझन नव्या थीमसह प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ‘बिग बॉस’ची थीम नेमकी काय असणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. यावेळी कार्यक्रमाची थीम टाइमचा तांडव अशी आहे. या थीममध्ये स्पर्धकांना वेळ, प्रवास किंवा भूतकाळ याबद्दल चर्चा करु शकतात. कारण मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्याची आठवण करुन देत ‘बिग बॉस’च्या घराचेही गुहेत रूपांतर झाले आहे. ही एक सामान्य गुहा नाही, तर एक भव्य गुहेसारखे हॉटेल आहे. कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि प्रॉडक्शन डिझायनर वनिता कुमार यांच्या जोडीने हे घर डिझाइन केले आहे. याबद्दल बोलताना ओमंग म्हणाले, “दरवर्षी एका थीमवर काम करायचं असतं. गेल्या वर्षी आम्ही युरोपियन शैलीत घर बांधले होते, पण यावेळी आम्हाला भारतीय घर बांधायचे होते. प्रत्येक मालिकेत आणि प्रत्येक चित्रपटात आपल्याला भारतीय घरे दिसतात, मग आपण वेगळे काय करायचे, हे आव्हान होते, तेव्हा विनीता म्हणाली की, शोची थीम टाईम ट्रॅव्हल आहे, त्यामुळे आपण भूतकाळात, गुहेच्या युगात जाऊ शकतो”.

‘तसं पाहिलं तर अजिंठा-एलोरा असो की एलिफंटा, चित्रकला व कला या लेण्यांमधून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या घराला भव्यता त्यांनी केव्ह हॉटेल म्हणजेच गुहेसारखे हॉटेल तयार केले. सर्व लिव्हिंग रूममध्ये एक मोठा चेहरा पाहायला मिळत आहे. हा एका राजपुत्राचा चेहरा आहे. तर बाहेर तलावाजवळ एका महिलेचा चेहरा ठेवण्यात आला आहे. याशिवाय दरवेळेप्रमाणे घोडे, प्राणी, फुलपाखरे आदीही गोष्टी पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, बागेत बाथरूमच्या प्रवेशद्वारावर एक मोठा लाकडी ट्रोजन हॉर्स आहे, जिथे खूप गप्पागोष्टी करताना स्पर्धक दिसतील. यावेळी, बिग बॉस टास्क व्यतिरिक्त, स्पर्धकांना घरातील खडबडीत रस्त्यावरुन जावे लागेल, कारण यावेळी घरात सर्वत्र खांब आहेत. फरशीही फ्लॅटऐवजी अनड्युलेटिंग करण्यात आली आहे. बागेचे क्षेत्र तीन भागात विभागलेले आहे.

आणखी वाचा – “ज्या परिस्थितून तो आला आणि…”, सूरजच्या गावी जाणार वर्षा उसगांवकर, म्हणाल्या, “प्रसिद्धी मिळाली त्यानंतर…”

View this post on Instagram

A post shared by Big boss 18 (@bigg_boss._.18)

घराची दिवाणखाना अतिशय भव्य व मोठी आहे. किचन, डायनिंग रुम आणि ड्रॉईंग रुमबरोबरच यावेळी जेलचीही निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्यांदाच घराच्या मधोमध असा कारागृह बांधण्यात आला आहे. तर कन्फेशन रुमच्या बैठकीला दिवाणाचे स्वरुप देण्यात आले आहे. येथे एक मोठे घड्याळ आहे, तर जमिनीवर सोन्याची नाणी जडलेली आहेत. तर घरात भविष्यकालीन शैलीतील कार उभी आहे, जी काळाच्या प्रवासाचे प्रतीक आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “हाच प्लेबॉय…”, निक्की अरबाजमधील जवळीक पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “प्रेमाचं नाटक करत…”

त्याचप्रमाणे बेडरुमचे फ्लोअरिंग जिन्यासारखे आहे, त्यामुळे दररोज चढताना आणि खाली जाताना स्पर्धकांना चिडचिड होण्याची शक्यता आहे. येथे, बेड देखील वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बेडरुमच्या भिंती सुंदर मत्स्यालय, तलाव इत्यादींनी आकर्षक बनवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर यावेळी पायऱ्या व खांब असल्याने अधिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावर्षी स्पर्धक १०७ कॅमेऱ्यांच्या रडारखाली असतील.

Tags: Bigg Boss 18Bigg Boss 18 House Photohindi bigg boss update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Genelia Deshmukh Navratri Puja Video

Video : देशमुखांच्या घरी अशी केली जाते नवरात्रीमध्ये पूजा, देवघर आहे इतकं मोठं, जिनिलीयाने शेअर केला Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.