बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : जिनिलीया देशमुखचा नवरा, मित्र-मंडळींसह घरातच भयंकर वेडेपणा, गाणं वाजताच बेभान होऊन नाचले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 19, 2024 | 3:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Funny Reel Video

‘चिकनी चमेली’ गाण्यावर रितेश-जिनिलीयाचा जबरदस्त डान्स

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Funny Reel Video : सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख. रितेश व जिनिलिया दोघांच्या बॉण्डिंगचे लाखो चाहते दिवाने आहेत. बॉलिवूडसह मराठीमधील एक आदर्श जोडपं म्हणून बरेचदा या जोडीचं उदाहरण दिलं जातं. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ते ओळखले जातात. अनेकदा जिनिलिया रितेशबरोबर स्पॉट होताना दिसते. रितेश व जिनिलीयाही जोडी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. रितेशला प्रत्येक गोष्टीत जिनिलीयाने खंबीरपणे साथ दिली. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच सक्रिय असते. हे दोघे नेहमीच काही ना काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या दोन्ही मुलांचे अनेक रीलही ते शेअर करत असतात. अशातच जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका फनी रील व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा – Video : रितेश देशमुखने घरीच मुलांसाठी तयार केले पार्टीचे कपडे, टीशर्टवर फुटबॉलचं चित्र रंगवलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रितेशसह त्यांचे काही मित्रमंडळी धमाल मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये जेनेलिया, रितेश आणि त्यांचे मित्र हे ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. जेनिफर विंगेट, कांची कौल, आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख, समिता बांगर्गी हे सगळे कलाकार रितेश-जिनिलीयाबरोबर या व्हिडीओमध्ये तुफान धमाल करताना दिसत आहेत. त्यांचा हा गमतीशीर रील व्हिडीओ अनेकांच्या पंसतीस पडलेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. आणि व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – विवियान डिसेनाने पहिल्या पत्नीला फसवलं?, घटस्फोटापूर्वीच पत्रकार मुलीशी अफेअर अन्…; म्हणाला, “मला सहन करेपर्यंत…”

जिनिलिया व रितेश ही लोकप्रिय जोडी आहे. दोघंही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. त्याचवेळी दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघंही लग्नबंधनात अडकले. रितेश व जेनिलिया यांचे लग्न धुमधडक्यात पार पडले होते.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Rapper Badshah Daughter

Video : सात वर्षांची आहे बादशाहची लेक, घटस्फोट झाला पण मुलीशी जवळीक, रॅपही करते अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.