‘बिग बॉस १७’ या शोचा विजेता मुनव्वर फारुकी हा घरात असताना कायमच चर्चेत असे. त्याच्या आयुष्यातील अनेक व्यक्तींमुळे ‘बिग बॉस’च्या घरात तो चर्चेत आला होता. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही त्याचया नावाच्या अनेक चर्चा होताना दिसल्या. अशातच आता मुनव्वर फारुकी हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री एका हुक्का पार्लरवर छापा टाकून काही जणांना ताब्यात घेतलं. त्यामध्ये स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. हुक्का पार्लरमध्ये अवैध सेवन होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती, त्यानंतर त्यांनी छापेमारी केली होती. ही घटना मंगळवार, २६ मार्च रोजी रात्री घडली. मात्र, चौकशीनंतर मुनव्वर फारुकीला सोडून देण्यात आले.
एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने गुप्त माहिती मिळाल्यानंतर बोरा बाजारातील सबलन हुक्का बारवर छापा टाकला. होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्या टीमला मुंबईतील एका हुक्का बारमध्ये हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही छापेमारी केली. तिथं सापडलेल्या वस्तूंची तपासणी केल्यानंतर काही लोकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश आहे”.

छापेमारीत हुक्का बारमधून जे काही सामान जप्त करण्यात आले त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या संदर्भात अटकेत असलेल्या अन्य सहा व्यक्ती आणि मुनावर फारुकी यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, मुनवर फारुकीविरुद्ध सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा, २००३ किंवा COTPA, २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी संध्याकाळी हुक्का बारवर छापा टाकण्यात आला, ज्यामध्ये 13 जणांनाही ताब्यात घेण्यात आले.
आणखी वाचा – ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर
मुंबई पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात मुनव्वर फारुकी हा हुक्का बारमध्ये उपस्थित होता. नंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, जी पॉझिटिव्ह आली आणि त्यामुळे त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, याप्रकरणी मुनव्वर फारुकी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य आलेले नाही. पण त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर विमानतळावरील एक फोटो शेअर करत “खूप थकलो आणि आता प्रवास करता आहे” असं म्हटलं आहे.