छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा २८ जानेवारी रोजी पार पडला. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७व्या पर्वात प्रसिद्ध कॉमेडियन व अभिनेता मुनव्वर फारुकीने विजेतेपद पटकावले. यामुळे त्याच्या अनेक चाहते मंडळींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’चं विजेतेपद जिंकल्यानंतर मुनव्वरने सलमान खान व ट्रॉफीबरोबरचा फोटो शेअर केला. सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या त्याच्या या पोस्टने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याच्या दिवशी मुनव्वरकहा वाढदिवस होता आणि या शोचे विजेतेपद पटकावत त्याने आपला वाढदिवस साजरा केला. त्यानंतर घराबाहेर येताच पापाराझींबरोबरही मुनव्वरने त्याचा वाढदिवस साजरा केला. अशातच आणखी एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यात मुनव्वर त्याहकीय लाडक्या लेकासह वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. सोशल मीडियावर मुनव्वरचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून सर्वत्र या व्हिडीओची चर्चा सुरू आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, मुनव्वर फारुकी आपल्या घरी पोहचला आहे. ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी टेबलवर ठेवली आहे आणि तो आपल्या मुलाबरोबर दोन केक कापत आहे. केक कापल्यानंतर तो प्रथम आपल्या मुलाला केकचा एक घास भरवतो. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओमध्ये दोघेही बापलेक खुप खुश दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
तसेच मुनव्वरने बिग बॉसचे विजेतेपद पटकावल्यानंतर आनंद साजरा केला . यावेळी ‘फिल्मीग्यान’शी साधलेल्या संवादात मुनव्वरने असे म्हटले की, “माझ्या मुलाने मला सांगितले होते की, ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन या.” दरम्यान, या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये अनेकांनी मुनव्वरचे कौतुक केले आहे. तसेच त्याला कमेंट्सद्वारे शुभेच्छाही दिल्या आहेत.