Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ या रिऍलिटी शोची सध्या विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात हा कार्यक्रम कोणतीही कसर पडू देत नाही आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’मधील सर्वच स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यंदाच्या सीजनमधील लोकप्रिय ठरत असलेले स्पर्धक म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. या जोडीने सेलिब्रिटी कपल म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली.
‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यापासून ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून त्यांच्यात झालेल्या वादाने तर सीमा पार केली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या पतीविरोधात तक्रार करत नाराजी व्यक्त केली. दोघांच्या वादामुळे ही जोडी लक्षवेधी ठरली असली तरी आता घरच्यांच्या नाराजीत ही जोडी अडकली असल्याचं समोर आलं आहे.
‘बिग बॉस’च्या घरात दोन स्पर्धकांना विशेष वागणूक दिली जात आहे यावरून होणाऱ्या चर्चेला जोरदार उधाण आलं आहे. हे स्पर्धक दुसरे तिसरे कोणी नसून अंकिता लोखंडे व विकी जैन आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधी दोघांनी केलेल्या करारातील नियम व अटींचा ते फायदा घेत असल्याची चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस’च्या घरात विकी जैनने हेअरकट केला असल्याने चर्चा सुरु झाली आहे. हे पाहून अरुण माशेट्टी व तहलका भडकताना दिसले आहेत. याशिवाय मन्नारा चोप्राही ‘बिग बॉस’वर रागावली आहे. विकीने केस कापलेले पाहून तहलका त्याला विचारते की, ‘तू केस कापले आहेत का?’. यावर उत्तर देत विकी नकार देतो.
तहलका रागाने ‘बिग बॉस’ला सांगताना दिसत आहे की, ‘बिग बॉस’ विक्की भैयाने तर हेअरकट केला आहे. यावर सना बोलते की, ‘त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं त्यांनी लिहून घेतलं आहे’. हे ऐकून अरुण म्हणतो, ‘त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं कसं लिहिलंय?’ दरम्यान, मनाराही कॅमेऱ्यासमोर उभी राहून ‘बिग बॉस’ला विनंती करते की, ‘कृपया मलाही बिग बॉस द्या, हा स्पष्टपणे पक्षपातीपणा आहे’. विकी व अंकिताला मिळणाऱ्या स्पेशल ट्रीटमेंटवरून आता ‘बिग बॉस’मधील स्पर्धकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.