शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’च्या घरात बॉयफ्रेंडची एंट्री पाहून ईशा मालवीयाही मोठा धक्का, अभिषेक ढसाढसा रडू लागला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 28, 2023 | 4:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Latest News

'बिग बॉस'च्या बॉयफ्रेंडची एंट्री पाहून ईशा मालवीयाही मोठा धक्का, अभिषेक ढसाढसा रडू लागला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

Bigg Boss 17 Latest News : सध्या हिंदी ‘बिग बॉस १७’ ची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. ‘बिग बॉस’ सुरु झाल्यापासून स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या आठवड्यात खानजादी, सोनिया बन्सल, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, सनी आर्या आणि सना रईस खान हे सहा स्पर्धक यंदाच्या आठवड्यात एलिमिनेशन राऊंडमध्ये आहेत. अशातच एलिमिनेशनपूर्वी, एक धक्कादायक बातमी साऱ्यांना दिली. दोन नवीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री होणार असून सध्या एक वाईल्ड कार्ड स्पर्धकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

येत्या वीकेंड स्पेशल एपिसोडचे दोन प्रोमो वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरून शेअर केले आहेत. या प्रोमोमध्ये समर्थ जुरेल नावाचा नवीन वाइल्ड कार्ड स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताना दिसत आहे. हा प्रोमो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”ईशाचा बॉयफ्रेंड बीबी हाऊसमध्ये आल्यावर अभिषेकला झालं दुःख.”

आणखी वाचा – “दोन ते तीन महिने खूप कष्ट करत आहेस आणि…” सूनेसाठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट, म्हणाल्या, “सूनबाई तुला…”

या प्रोमोमध्ये समर्थ बीबी हाऊसच्या मुख्य दारातून आत जाताना दिसत आहे. समर्थचा घरात प्रवेश होताच ईशाला धक्का बसलेला दिसतो, त्याला पाहून अभिषेक भावुक होतो आणि ढसाढसा रडू लागतो. अभिषेकचे डोळे भरून आल्यानंतर, अंकिता लोखंडे आणि मुनव्वर फारुकी त्याच सांत्वन करताना दिसत आहेत. ईशा समर्थला विचारते की, ‘तू असं काय सांगून इथे आला आहेस?’. त्यानंतर समर्थ ईशाला विचारतो, ‘मी तुझा कोण आहे?’ यावर ईशा उत्तर देते की, ‘तू माझा मित्र आहेस’. हे ऐकून समर्थ जोरजोरात हसायला लागतो. हे सर्व पाहून अभिषेक पूर्णपणे कोसळतो आणि रडू लागतो. त्यावेळी घरातील सर्व सदस्य अभिषेकची काळजी घेताना दिसतात.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, कार्यक्रम बंद होण्यामागचं कारण काय?, निलेश साबळे म्हणतो, “वाहिनीकडून सांगण्यात आले की…”

दरम्यान, ईशाही अभिषेकला गप्प करताना दिसत आहे. पण त्याचवेळी समर्थ असं बोलतो की, ‘सर्वांचे रडून झालं असेल तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. ही मुलगी जी तुमच्यामध्ये आहे ती एक नंबरची खोटारडी आहे. आधी ती अभिषेकला स्वतःचा मित्र म्हणाली आणि आता मी तिचा मित्र आहे असं सांगतेय.’ हे ऐकून अभिषेकचा पारा चढतो, आणि ते दोघेही एकमेकांशी भांडताना दिसतात. यादरम्यान समर्थ ईशाला मूर्ख मुलगी असंही म्हणतो.

Tags: नवीद सोलनील भटसना रईस खान (वकील)सनी आर्या (तहलका भाई)सोनिया बन्सलखानजादी (फिरोजा खान)अनुराग डोभाल/बाबू भैया (मोटोव्लॉगर)अभिषेक कुमारअंकिता लोखंडेअरुण माशेट्टीमुनव्वर फारुकीईशा मालवीयरिंकू धवनबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस १७ सलमान खानबिग बॉस १७ स्पर्धकांची यादीबिग बॉस १७ ग्रँड प्रिमिअरबिग बॉस १७ मन्नारा चोप्राबिग बॉस १७ लेटेस्ट अपडेटबिग बॉस १७ लेटेस्ट मराठी न्यूजऐश्वर्या शर्माजिग्ना व्होरा (एक्स क्राइम रिपोर्टर)विकी जैनAbhishek kumarAishwarya SharmaAnurag Dobhalbigg boss 17Bigg Boss 17 Ankita LokhandeBigg Boss 17 contestant list marathi newsBigg Boss 17 contestants list in marathiBigg Boss 17 marathi newsBigg Boss 17 salman khanBigg Boss 17:marathi batmyaBigg Boss marathi newseverything about Bigg Boss 17 contestantisha malviyaJigna VoraKhanzadimannara chopraMunawar FaruquiNeil BhattRinku Dhawansalman khansamarth jurelSana Raees KhanSoniya Bansalvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
'friends' fame actor Matthew Perry dies

'फ्रेंड्स' फेम प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन, हॉट टबमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.