Bigg Boss 17 Latest News : सध्या हिंदी ‘बिग बॉस १७’ ची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. ‘बिग बॉस’ सुरु झाल्यापासून स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या आठवड्यात खानजादी, सोनिया बन्सल, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, सनी आर्या आणि सना रईस खान हे सहा स्पर्धक यंदाच्या आठवड्यात एलिमिनेशन राऊंडमध्ये आहेत. अशातच एलिमिनेशनपूर्वी, एक धक्कादायक बातमी साऱ्यांना दिली. दोन नवीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री होणार असून सध्या एक वाईल्ड कार्ड स्पर्धकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
येत्या वीकेंड स्पेशल एपिसोडचे दोन प्रोमो वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरून शेअर केले आहेत. या प्रोमोमध्ये समर्थ जुरेल नावाचा नवीन वाइल्ड कार्ड स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताना दिसत आहे. हा प्रोमो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”ईशाचा बॉयफ्रेंड बीबी हाऊसमध्ये आल्यावर अभिषेकला झालं दुःख.”
या प्रोमोमध्ये समर्थ बीबी हाऊसच्या मुख्य दारातून आत जाताना दिसत आहे. समर्थचा घरात प्रवेश होताच ईशाला धक्का बसलेला दिसतो, त्याला पाहून अभिषेक भावुक होतो आणि ढसाढसा रडू लागतो. अभिषेकचे डोळे भरून आल्यानंतर, अंकिता लोखंडे आणि मुनव्वर फारुकी त्याच सांत्वन करताना दिसत आहेत. ईशा समर्थला विचारते की, ‘तू असं काय सांगून इथे आला आहेस?’. त्यानंतर समर्थ ईशाला विचारतो, ‘मी तुझा कोण आहे?’ यावर ईशा उत्तर देते की, ‘तू माझा मित्र आहेस’. हे ऐकून समर्थ जोरजोरात हसायला लागतो. हे सर्व पाहून अभिषेक पूर्णपणे कोसळतो आणि रडू लागतो. त्यावेळी घरातील सर्व सदस्य अभिषेकची काळजी घेताना दिसतात.
दरम्यान, ईशाही अभिषेकला गप्प करताना दिसत आहे. पण त्याचवेळी समर्थ असं बोलतो की, ‘सर्वांचे रडून झालं असेल तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. ही मुलगी जी तुमच्यामध्ये आहे ती एक नंबरची खोटारडी आहे. आधी ती अभिषेकला स्वतःचा मित्र म्हणाली आणि आता मी तिचा मित्र आहे असं सांगतेय.’ हे ऐकून अभिषेकचा पारा चढतो, आणि ते दोघेही एकमेकांशी भांडताना दिसतात. यादरम्यान समर्थ ईशाला मूर्ख मुलगी असंही म्हणतो.