बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ” संपूर्ण खेळ एकट्याने खेळले…”, घराबाहेर पडताच मन्नारा चोप्राचा अंकिता लोखंडेला टोमणा, म्हणाली, “ती विकीबरोबर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 29, 2024 | 6:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mannara Chopra On Ankita Lokhande

Bigg Boss 17 : " संपूर्ण खेळ एकट्याने खेळले…", घराबाहेर पडताच मन्नारा चोप्राचा अंकिता लोखंडेला टोमणा, म्हणाली, "ती विकीबरोबर…"Bigg Boss 17 : " संपूर्ण खेळ एकट्याने खेळले…", घराबाहेर पडताच मन्नारा चोप्राचा अंकिता लोखंडेला टोमणा, म्हणाली, "ती विकीबरोबर…"

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’ चे विजेतेपद पटकावले आहे. सर्व स्पर्धकांना पराभूत करुन मुनव्वरने ‘बिग बॉस १७’ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. ‘बिग बॉस १७’ च्या महा अंतिम सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली. या ग्रँड फिनालेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. अशातच या या पर्वाच्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मन्नारा चोप्राचा एक व्हिडीओही समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती अंकिता लोखंडेबद्दल अनेक गोष्टी बोलताना दिसत आहे. (Mannara Chopra On Ankita Lokhande)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मन्नारा म्हणाली, “अंकिताजी खूप चांगली खेळली. ती ‘बिग बॉस’चीही चाहती आहे. खेळ कसा खेळायचा हे तिला माहीत होते. मात्र ती पती विकी जैनबरोबर आली होती आणि मी घरी एकटीच होते. मी संपूर्ण खेळ एकट्याने खेळले” असं ती म्हणाली.

आणखी वाचा – Bigg Boss Season 17 : विजेतेपदावर शंका घेणाऱ्या प्रेक्षकांना मुनव्वर फारुकीचं उत्तर, ठणकावून म्हणाला, “मी फिक्स विनर होतो…”

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

मन्नारा पुढे म्हणाली, “हे तीन महिने माझ्यासाठी खूप मजेशीर होते. मी घरी खूप मजा केली. माझ्यासाठी हा काळ सुट्टीसारखा होता. होय, मी तिला पराभूत केले आहे पण माझ्या मनात तिच्यासाठी खूप प्रेम आहे” असंही ती म्हणाली. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये मन्नारा व अंकिता यांच्यात अनेकदा जोरदार वाद झालेले पाहायला मिळाले.

आणखी वाचा – Bigg Boss 17 Grand Finale : ‘बिग बॉस’ विजेत्याच्या स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी अन्…; डोंगरी परिसरात दणक्यात केलं स्वागत, व्हिडीओ व्हायरल

याशिवाय त्यांनी मन्नाराने जनतेचे मनापासून आभार मानले. हात जोडून ती तिच्या चाहत्यांना म्हणाली, “मला टॉप ३ मध्ये आणल्याबद्दल आणि मुलींमध्ये मला पहिल्या क्रमांकावर ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रेमाशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते”. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक अरुण माशेट्टी होता. तर यानंतर अंकिता लोखंडे व नंतर मन्नारा चोप्रा बाद झाल्या.

Tags: ankita lokhandeankita lokhande and mannara chopra fightbigg boss 17entertainmentmannara chopra
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
After winning Bigg Boss 17, Munawar Faruqui talk about Ayesha Khan see the details

Bigg Boss 17 Grand Finale : मुनव्वर फारुकीने आयेशा खानला लगावला टोला, घरातून बाहेर येताच केलं भाष्य, म्हणाला, “लोकांना महत्त्व...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.