शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : विकी जैनने पार्टी केल्याचा रोहित शेट्टीने केला खुलासा, ऐकून रागात अंकिता भलतंच काही बोलून गेली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 27, 2024 | 2:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : विकी जैनने पार्टी केल्याचा रोहित शेट्टीने केला खुलासा, ऐकून रागात अंकिता भलतंच काही बोलून गेली अन्…

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मध्ये रोहित शेट्टी आल्याने हा भाग अधिक रंजक झालेला पाहायला मिळाला. रोहितने फिनाले मध्ये पोहोचलेल्या पाच स्पर्धकांना कठीण प्रश्न विचारत त्यांना त्यांच्या खऱ्या खेळाचा आरसाही दाखवला. यामुळे सोशल मीडियावर रोहितचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय रोहितने स्पर्धकांसह धमाल-मस्ती केली असल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान त्याने अंकिता लोखंडेला असेही सांगितले की, विकीने शोच्या बाहेर जाऊन त्याच्या घरी पार्टी केली आहे.

रोहितने अंकिताला असे सांगितले की, “विकी भैया बाहेर पार्टी करत आहे. सना खान, आयेशा खान, ईशा व एक मुलगी देखील होती ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पार्टी केल्यानंतर सर्वजण घरीच राहिले”. रोहितचे बोलणे ऐकून अंकिता आश्चर्यचकित होते आणि म्हणते की, ‘मी त्याला सोडणार नाही’. अंकिताचे हे वक्तव्य ऐकून सगळेच हसायला लागतात.

आणखी वाचा – Video : क्रांती रेडकरच्या मुलीने बाहुलीला घातली आंघोळ, करामत पाहून वडील ओरडले, पण नेटकऱ्यांना दिसली भलतीच गोष्ट, म्हणाले, “तुमच्या गॅलरीमध्ये…”

विकीला पापाराझींनी स्पॉट केलं तेव्हा त्याला सना खानबद्दल देखील विचारण्यात आले. सना देखील त्याच्या पार्टीत आली होती का असं विचारलं असता विकी यावर हसला आणि म्हणाला, “सना तिच्या घरी आहे. सनाजींची कंपनी संपली”. विकी घरातून बाहेर जात असताना अंकिताने त्याला आधीच ताकीद दिली होती की तो बाहेर जाऊन पार्टी करणार नाही. मात्र, विकी घरातून बाहेर पडताच विकीने पहिली गोष्ट केली ती म्हणजे मित्रपरिवार व कुटुंबियांसह पार्टी. अंकिता शोमध्ये असे म्हणताना दिसली होती की, “ती घरी जाऊन सीसीटीव्ही तपासेल की, विकी घरी पार्टी करत आहेत की नाही”.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – “दोघींमध्ये आता…”, सासू व आईच्या भांडणात विकी जैनची सावरासावर, बायकोशी न पटण्यावरुन म्हणाला, “एकत्र पहिल्यांदाच राहिलो पण…”

मात्र, त्यानंतर अभिषेकशी बोलताना अंकिता, “विकी असं करणार नाही, असं असलं तरी आमच्या घरी कोणी येत नाही”, असंही म्हणताना दिसली. आता अंकिता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावर काय सत्य आहे हे जेव्हा तिच्यासमोर येईल तेव्हा अंकिता काय करणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainbigg bossbigg boss 17entertainmentvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Prathamesh Laghate gave special surprise to Mugdha's sister Mrudul Vaishampayan and shared photo with her

प्रथमेशने मुग्धाच्या बहिणीला दिलं खास सरप्राइज, मेहुणीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.