Bigg Boss 17 Latest News : सलमान खानचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉसचा १७’वा सीझन सध्या चर्चेत आहे. या शोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये एकामागोमाग एक नवनवीन ट्विस्ट येतचं आहेत. आणि या ट्विस्टमुळेच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून अनेक स्पर्धकांच्या एंट्री होत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात नुकतीच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून ओरीची एंट्री झाली आहे. याशिवाय या शोमध्ये अभिनेत्री राखी सावंत व तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी एंट्री घेणार असल्याची चर्चा होती.
राखी सावंतने ‘बिग बॉस’चा आतापर्यंत आलेला प्रत्येक सीझन बहारदार केला आहे. त्यामुळे या सीझनमध्येही तिच्या एंट्रीची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. अशातच बिग बॉस १७मध्ये, निर्माते राखी सावंत व तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेणार असल्याच्या अफवा समोर आल्या. अशातच आता राखी सावंतने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली असून हे सर्व दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे.
राखी सावंतने अफवा पसरवणाऱ्या या पोस्टवर कमेंट करत स्पष्टीकरण दिलं आहे. ती सध्या दुबईत असल्याचं तिने सांगितलं आहे. राखी सावंत व आदिल ‘बिग बॉस’मध्ये येणार असल्याची बातमी पोस्ट करणाऱ्या पापाराझींच्या कमेंट सेक्शनमध्ये राखी सावंतने लिहिले, “मी दुबईमध्ये आहे. माझ्याकडे वेळ नाही, मी खूप व्यस्त आहे त्यामुळे या सर्व खोट्या बातम्या आहेत. कृपया माझ्या नावाने कोणालाही प्रसिद्धी देऊ नका, अशा लोकांची लाज वाटते”.

यानंतर राखीने आणखी एका कमेंटमध्ये लिहिले, “चुकीची बातमी, एकदम चुकीची बातमी, आदिल माझ्या नावाने प्रसिद्धी घेत आहे. या सर्व चुकीच्या बातम्या आहेत.” अशी कमेंट करत तिने ‘बिग बॉस’च्या चर्चांवर मौन सोडलं आहे.