शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : संपूर्ण सीझनसाठी नील भट्ट नॉमिनेट, मास्टरमाइंड विकी जैनने घेतला बायकोचा बदला

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 28, 2023 | 6:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
neil bhatt nominated for whole season

neil bhatt nominated for whole season

‘बिग बॉस १७’ चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात बरीच मारामारी आणि भांडणं पाहायला मिळत आहेत. एकीकडे या कार्यक्रमात अंकिता लोखंडे व नील भट्ट यांच्यात बरीच भांडण होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे विकी-अंकिता आणि ऐश्वर्या शर्मा-नील यांच्या जोरदार वादावादी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा कार्यक्रमातून एकमेकांना नॉमिनेट करत बदला घेण्याचे डावपेच खेळले जात आहेत. मात्र आता नव्या प्रोमोत नील संपूर्ण सीजनसाठी नॉमिनेट झाला असल्याचं समोर येत आहे. (neil bhatt nominated for whole season)

मंगळवारी २८ नोव्हेंबरला रात्री ‘बिग बॉस १७’च्या घरात नॉमिनेशन टास्क होणार आहे. जिथे स्पर्धक एकमेकांना घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिसणार आहेत. यादरम्यान घरातील दोन जोडपी एकमेकांना नॉमिनेट करण्याचा प्रयत्न करताना दिसले. अंकिता-विकी नीलला तर नील अंकिताला नॉमिनेट करतात. या सगळ्यात या दोघांची चांगलीच भांडण होतात. अंकिता लोखंडे व नील भट्ट यांच्या चांगलीच वादावादी होते. नील अंकिताची नक्कल करतानाही दिसतो. त्यामुळे अंकिताला त्याचा राग येतो. यासगळ्यात मग विकीदेखील नीलबरोबर भांडायला येतो. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात एक खास शक्ती विकीला मिळते. त्यामुळे विकीचं पारडं जड होतं.

Neil hote hai poore season ke liye nominate. Did this news shock you too? ????

Dekhiye #BiggBoss17, Mon-Fri 10PM & Sat-Sun 9PM sirf #Colors aur @Jiocinema par. #BB17 #BiggBoss@BeingSalmanKhan @HyundaiIndia @DaburIndia @TRESemmeIndia @iamappyfizz @Chingssecret… pic.twitter.com/kmk4FgatKC

— ColorsTV (@ColorsTV) November 28, 2023

ही खास शक्ती विकीला का मिळाली? कारण विकी काही दिवसांपासून मास्टरमाइंडच्या खास यादीच आहे. या यादीतील सगळ्यांना ‘बिग बॉस’कडून खास शक्ती दिली की ते या घरातून कोणत्याही एका व्यक्तीला या पर्वातून बाहेर करू शकतात. याचा फायदा विकी घेतो आणि नीलचं नाव घेतो. तेव्हा नील खूपच जास्त संतापला आणि सांगतो, की आता तो सगळ्यांना दाखवणार की बदला नेमका कसा घेतला जातो. तर दुसरीकडे विकीने आपल्या खेळातून स्पष्ट केलं की बदला कशाप्रकारे घेतला जातो.

नील भट्ट व ऐश्वर्या हे जोडपं ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेतून प्रसिद्ध व लोकप्रिय झाले. त्याबरोबर ते आतपर्यंतचे ‘बिग बॉस १७’च्या घरातील चर्चेत कपल आहे. तर अंकिता व विक्की हे जोडपं सुद्धा त्यांच्या मजबूत खेळासाठी बरेच चर्चेत आहेत. विक्कीला मास्टरमाइंडची पदवी पण मिळाली आहे. या दोन्ही जोडप्यांमध्ये कार्यक्रम सुरु झाल्यापासून कधीच पटलं नाही. एकमेकांसमोर तर कधी त्यांच्या मागून एकमेकांबाबत वाईट बोलताना दिसतात.

Tags: ankita lokhandeBigg boss 17 promoNeil Bhattvicky jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
Next Post
Neena Gupta On Relationship

"मी नेहमीच चुकीच्या माणसांची निवड करते", रिलेशनशिपबाबत नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, "तो आधीच विवाहित…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.