शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरातील एंट्रीच्या अफवांवर ओरीने सोडलं मौन, हसत म्हणाला, “कोणता बॉस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 23, 2023 | 11:03 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Orry On Bigg Boss 17

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरातील एंट्रीच्या अफवांवर ओरीने सोडलं मौन, हसत म्हणाला, "कोणता बॉस…"

ओरी उर्फ ​​ओरहान अवतारमणी बी-टाऊनमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अनेकदा तो स्टार किड्सबरोबर पार्टी करताना दिसला असून त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. ओरी बॉलीवूडच्या मोठमोठ्या सोहळ्यांमध्येही दिसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘ओरी काय करतो?’ असा ट्रेंड सुरू आहे. यानंतर आता ओरीबाबत खूप मोठी बातमी समोर आली आहे. ओरी लवकरच सलमान खानच्या ‘बिग बॉस १७’मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांवर आता ओरीने मौन सोडलं आहे. (Orry On Bigg Boss 17)

इटाइम्सच्या अहवालानुसार, ओरी लवकरच ‘बिग बॉस १७’च्या घरात प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र, वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घेतलेली एन्ट्री ‘बिग बॉस’च्या घरात शेवट्पर्यंत टिकून राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या, रिपोर्टनुसार, ओरी ‘बिग बॉस १७’च्या मंचावर सलमान खानबरोबर ‘विकेंड का वार’मध्ये दिसणार आहे.

आणखी वाचा – वरुण धवन व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या विरोधामुळे ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटात दिसणार नव्हती आलिया भट्ट, करण जोहरने केला खुलासा, म्हणाला, “आलियाच्या जागी…”

अशातच आता ओरीने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. काल रात्री ओरी मुंबईत सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीच्या ‘फरे’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान दिसला होता. यावेळी ​​ओरी रेड कार्पेटवर पोज देत असताना त्याला विचारले की, “‘बिग बॉस १७’ च्या घरात तो प्रवेश करणार आहे का? ओरीने या प्रश्नावर सुरुवातीला स्मितहास्य केले आणि नंतर गमतीने पापाराझींना विचारलं, “कोणता बॉस…?”.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून होणार ओरीची एन्ट्री, सलमानसह चित्रीकरणास करणार सुरुवात, नक्की ओरी आहे तरी कोण?

ओरी हा बॉलिवूड कलाकार नाही किंवा स्टार किडदेखील नाही, पण अंबानींपासून ते कपूर, खान कुटुंबापर्यंत तो अनेक सेलिब्रिटींचा खास आहे. अनेक स्टार किड्स व बीटाऊन कलाकार ओरीला मित्र मानतात. ओरीच्या वाढदिवशी सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी त्याच्याबरोबरचे फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. ओरी स्वत:ला गायक, साँग रायटर, क्रिएटिव्ह डारेक्टर, फॅशन स्टायलिस्ट असल्याचं सांगतो.

Tags: bigg boss 17bigg boss wild card entrybollywood gossiporryorry in bigg bossOrry On Bigg Boss 17
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
bigg boss 17 give ultimatum to the contestants for cleaning the house video viral on social media

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'ने घराची दुर्दशा पाहून स्पर्धकांना दिली धमकी, म्हणाले, "एका तासात घर साफ करा नाहीतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.