Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरात आल्यापासून अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यातील वाद सुरु असलेला पाहायला मिळत आहे. एकमेकांशी बोलल्यानंतर वा दोघांच्या आईंनी समजावल्यानंतर त्यांच्या नात्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. याउलट त्यांच्यातील वाद वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंकिता व विकीच्या आईंनी त्यांना समजावले, इतकंच नव्हे तर सलमान खाननेही दोघांना मार्गदर्शन केले. मात्र त्यांच्यातील हा वाद सुरुच आहे.
‘बिग बॉस १७’ च्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता व विकी यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे. यावेळी दोघेही एकमेकांपासून दूर जाण्याविषयी बोलताना दिसले. यावेळी विकी अंकिताला विचारतो की, “,माझ्यात काय दोष आहे?”, तर यावर अंकिता म्हणते की, “तुझ्यामध्ये सहानुभूती नसल्यामुळे आपल्या नात्यात अडचण आली आहे, हा प्रॉब्लेम आहे”. तेव्हा विकी म्हणतो, “जेव्हा तू मुन्नवरचा हात धरायचीस. जेव्हा तू त्याला मिठी मारली तेव्हा मी देखील असंच वागायला हवं होतं. तुझे सर्व संबंध पवित्र आहेत आणि माझे सर्व वाईट आहेत”.
अंकिताने यावेळी असंही म्हटलं की, “मी असुरक्षित आहे”. यावर विकी रागात म्हणतो, “बस झालं. मला हे सगळं करुन कंटाळा आला आहे”. यावर अंकिता तीही थकली असल्याचं म्हणते. यावर विकी म्हणतो, “तू काहीच नाही केलं आहेस, मी आता खरं सांगायला सुरुवात केली तर तू ऐकूही शकणार नाहीस”.
याआधी अंकिता व विकी यांच्यात आणखी एक भांडण झालेलं पाहायला मिळालं. ज्यामध्ये अंकिता विकीला भांडी घासण्याबद्दल बोलत असते. विकी म्हणतो की, “तुला फक्त दोन लोकांसमोर लाज काढायची असते”. यावर अंकिता म्हणते, “ते कालपासून भांडत आहेत. मी तुझ्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही” असंही ती म्हणते. आणि विकीच्या आयुष्यातूनही निघून जात असल्याचं बोलते. शिवाय “तुझं तू बघून घे”, असंही अभिनेत्री म्हणते.