Bigg Boss 17 Latest News : मुनव्वर फारुकी हा ‘बिग बॉस १७ ‘ च्या घरातील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. मुनव्वर फारुकी प्रेक्षकांचा लाडका स्पर्धक असून त्याचा खेळ साऱ्यांच्या पसंतीस पडतो. मन्नारा चोप्रा बरोबरची त्याची मैत्री लोकांना आवडते. चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकारांमध्ये आता विनोदी कलाकारांनीही त्यांचे स्थान अधिक घट्ट केलं आहे. मुनव्वर नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावर भाष्य केल्याने चर्चेत राहतो.
मात्र आजवर त्याने कधीही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुठेही बोलला नाही. मात्र अशा परिस्थितीत आता बिग बॉसच्या घरात तो पहिल्यांदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसला. याआधी मुनव्वरने ‘लॉक अप’ या रिऍलिटी शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी भाष्य केलं होतं. त्यानंतर त्याने बिग बॉसच्या घरात त्याच्या भूतकाळातील आठवणी जाग्या केल्या.
‘बिग बॉस १७’ मध्ये मुनव्वर फारुकी याने त्याची पहिली पत्नी आणि मुलाबद्दल सांगितले. नील भट्ट बरोबर बोलत असताना मुनव्वरने त्याच्या मुलाबद्दल भाष्य केलं. यावेळी तो भावूक झालेला पाहायला मिळाला. यादरम्यान बोलताना मुनव्वर याने उघड केले की, ‘त्यांच्या पहिल्या पत्नीने दुसरे लग्न केले आहे. तीच अधिकृतपणे लग्न झालं आहे’. मुनव्वर यापुढे बोलत म्हणाला की, ‘आता त्यांच्या मुलाचा ताबा त्याच्याकडे आहे. त्यांचा मुलगा त्याच्या बरोबर बऱ्याच काळापासून राहत आहे आणि आता त्याला त्याची खूप आठवण येत आहे’, असं म्हणत मुनव्वरला अश्रू अनावर झाले.
याआधी त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जेव्हा एका मुलाखतीत भाष्य केलं होतं तेव्हा मुनव्वर त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल बोलला होता. मुनव्वरने सांगितले होते की, ‘आता त्याचा पहिल्या पत्नीशी संपर्क नाही. तो फक्त त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर त्याच्या मुलाच्या खर्चाबद्दल बोलतो’. मुनव्वर अनेक दिवसांपासून मीडिया इन्फ्लुएंसर नाझिला सेतेशीला डेट करत आहे. २०२२ मध्ये त्याने नाझिलाला डेट केल्याची कबुली दिली.