रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“या प्रसंगी असायला हवी होती”, सई लोकुरच्या डोहाळ जेवणाला बेस्टफ्रेंडची गैरहजेरी, नेटकरी प्रश्न विचारत म्हणाले, “ती कुठे आहे?”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 24, 2023 | 4:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sai Lokur baby Shower

"या प्रसंगी असायला हवी होती", सई लोकुरच्या डोहाळ जेवणाला बेस्टफ्रेंडची गैरहजेरी, नेटकरी प्रश्न विचारत म्हणाले, "ती कुठे आहे?"

‘बिग बॉस’या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक कलाकार लोकप्रियेच्या शिखरावर पोहोचले. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. अभिनय व नृत्य कौशल्याने तिने अनेकांची मन जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरात तिचा वावर साऱ्या प्रेक्षकांना भावला. सई, पुष्कर व मेघा या त्रिकुटाची मैत्री प्रेक्षकांना विशेष आवडली. ‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर सिनेसृष्टीतला तिचा वावर कमी झालेला पाहायला मिळाला. कारण या शोनंतर ती तिच्या संसारामध्ये रमली. ‘बिग बॉस मराठी’नंतर सईने लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. (Sai Lokur baby Shower)

लवकरच आता सई एका गोंडस अशा बाळाला जन्म देणार आहे. सई व तीर्थदीप आई-बाबा होणार आहेत. तिच्या आयुष्यात एका चिमुकल्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. त्यापूर्वी मोठ्या उत्साहात सईचं डोहाळ जेवण पार पडलं आहे. मॉर्डन अंदाजात सईच्या मैत्रिणींनी हे डोहाळ जेवण केलं होत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मात्र यातही नेटकरी आणखी एका अभिनेत्रीबद्दल विचारपूस करत आहेत.

आणखी वाचा – “हे पटत नाहीये…”, निवेदिता सराफ यांच्या ‘नाट्यगृहांचं खासगीकरण व्हावं’ या विधानाला खोडून काढत विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत, म्हणाली, “नाटक हा खेळ…”

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सईच्या डोहाळ जेवणाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल झाले आहेत. या तिच्या डोहाळ जेवणाचं आयोजन तिच्या मैत्रिणींनी केलं होत. त्यांचेही सईबरोबरचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र असं असलं तरी नेटकरी एका दुसऱ्याच अभिनेत्रीबद्दल विचारपूस करताना दिसत आहेत. ही अभिनेत्री आहे मेघा धाडे. ‘बिग बॉस’ मराठी सीझन १ ची विजेती अभिनेत्री मेघा व सई खूप जवळच्या मैत्रिणी आहेत.

आणखी वाचा – मुलींचे चेहरे न दाखवण्यावरून नेटकऱ्यांनी केला क्रांती रेडकरला सवाल, उत्तर देत म्हणाली, माझ्या मुलींची प्रोटेक्शनची जबाबदारी…”

मेघा व सईची मैत्री आपण ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वात सर्वांना पाहायला मिळाली. त्यामुळे जवळच्या मैत्रिणीच्या डोहाळ जेवणाला मेघा न दिसल्याने अनेक नेटकरी तिच्याबद्दल सईच्या डोहाळ जेवणाच्या पोस्टवर कमेंट करत विचारत आहेत. नेटकरी कमेंट करत ‘मेघा कुठे आहे, ती या प्रसंगी तिथे असायला हवी होती’, असं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत, ‘मेघा नाही दिसली, तुझी बेस्टफ्रेंड होती ना?’ असं म्हटलं आहे. अद्याप नेटकऱ्यांच्या या प्रश्नावर सई वा मेघा यांपैकी कोणीही भाष्य केलेलं नाही.

Tags: bigg bossentertainmentmarathi actressmarathi moviemarathi serialsai lokursai lokur baby showersai lokur bigg bosssai lokur troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss 17

Bigg Boss 17 : भूतकाळाच्या आठवणीत मुनव्वर फारुकीला आलं रडू, पहिल्या पत्नी व मुलाबद्दल पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाला, "खूप आठवण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.