टिव्ही जगतातील सध्या सर्वात चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस १७’. हा कार्यक्रम पहिल्या एपिसोडपासून बराच चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात रोज होणारे वादविवाद हे तर बरेच चर्चेत आहेत. आता दुसरीकडे वेगळंच प्रकरण सुरु झालं आहे. ईशा मालवीयाची लव्ह लाईफ सध्या बिग बॉसच्या घरात बरीच गाजताना दिसत आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमार व सध्याचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल या शोमध्ये एकत्र आल्यापासून तिच्या आयुष्यातील बरेच विषय समोर आले आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या चारित्र्यावर बरेच प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.कार्यक्रमात ती समर्थच्या जवळ येताना दिसत आहे. नॅशनल टिव्हीवर तिच वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी दाखवण्यात येत असल्यामुळे अभिनेत्री बरीच ट्रोल होताना दिसत आहे. अशातच ही बातमी समोर येत आहे की तिच्या पालकांना यासगळ्या गोष्टी आवडत नसल्यामुळे त्यांनी तिने हा शो सोडवा अशी मागणी केली आहे. (Isha Malviya parents wants to her out of the show)
नुकताच या गोष्टीचा खुलासा ईशाचा ‘उडारिया’ कार्यक्रमातील सहकलाकार गौरव बट्टा याने केला. गौरवने ‘पिंकविला’ला दिलेल्या एक मुलाखतीत याबाबत खुलासा केला. त्याने सांगितलं की, “शोमध्ये माझे व ईशाचे एकमेकांशी खूप चांगला बॉन्ड शेअर केला. मात्र आम्ही कधी एकमेकांना डेट केलेलं नाही. आम्ही तिच्या घरीही जात होतो. त्यामुळे तिच्या आईशी माझं खूप चांगलं बोलणं आहे”.
Nibba Nibbi Bigg Boss ko ab kuch aur hi show banate hue.@BeingSalmanKhan bhai ye aapka family show.pic.twitter.com/awppfnJqKo
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) November 4, 2023
गौरव पुढे सांगतो की, “ईशाची आई तिच्या शोमधील परफॉर्मन्सवर अजिबात समाधानी नाहीत. ईशा व समर्थ यांच्या नात्याबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती. तिच्या आई-वडिलांनाही तिचं शोमध्ये समर्थबरोबर राहणं पसंत नाही. ईशाच्या पालकांची ईच्छा आहे की ती या शोमधून बाहेर यावी. पण असं होऊ शकत नाही कारण तिचा या कार्यक्रमाबरोबर करार झाला आहे”.
जेव्हा समर्थ शोमध्ये आला होता तेव्हा अभिषेकने विकी जैनला सांगितलं होतं की ईशा त्याच्या आधीही शोमधील एका अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपला होती. मात्र त्याने कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. आता असं बोललं जात आहे की तो दुसरा तिसरा कोणी नसून गौरव बट्टा आहे. मात्र गौरव बट्टाने पुढे येऊन या अफवांना नकार दिला आणि हे स्पष्ट केलं की ईशाला त्याने कधीही डेट केलं नसल्याचं सांगितलं.