सध्या मनोरंजन विश्वात कलाकारांची लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळतेय. अनेक कलाकारांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत आपल्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. शिवाय अनेकांनी साखरपुडा सोहळा उरकत त्यांचे फोटोस सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअर केले आहेत. अशातच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने जाहीरपणे प्रेमाची कबुली सोशल मीडियावरून दिली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे. तीच नाव आहे रुता काळे. (Ruta Kale Relationship)
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात ही या मालिकेनं बाजी मारत बहुतेक पुरस्कार आपल्या नावे केले. मालिकेच्या कथानकावर आणि मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. अशातच या मालिकेतील एका कलाकाराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे रुता काळे. तिच्या बॉयफ्रेंडने तिला चक्क गुडघ्यावर बसून प्रपोज केलं आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावरून शेअर करत आपली अंगठीदेखील फ्लॉन्ट केली आहे.
रुता मालिकेत अक्षराच्या बहिणीच्या भूमिकेत दिसतेय. रुताने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमच छाप पाडली आहे. सध्या ती मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसतेय. मात्र रुता तिच्या मालिकेमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रुताच्या बॉयफ्रेंडने तिला अगदी रोमँटिक अंदाजात प्रपोज केलं असून त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.हे फोटो शेअर करत त्यांनी जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
या फोटोंमध्ये रुता हातात छत्री घेऊन उभी आहे आणि तिचा बॉयफ्रेंड तिला अंगठी देऊन प्रपोज करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती अंगठी दाखवत आहे. रुताचा बॉयफ्रेंड हा प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक असल्याचं समोर आलं आहे. अभिषेक लोकनर असे त्याचं नाव आहे. गेली अनेक वर्ष रुता व अभिषेक एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर आता त्यांनी जाहीरपणे सोशल मीडियावरून प्रेमाची कबुली दिली आहे. त्यांच्या या फोटोंवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.