‘बिग बॉस १७’ चे यंदाचे पर्व घरातील भांडण, वादविवाद, गॉसिप्स यांमुळे चांगलाच गाजत आहे. शो मधील प्रत्येक स्पर्धक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मेहनत करत आहेत. या शोमध्ये दर दिवशी काहीना काही ट्विस्ट येतच असतात. ज्यामुळे घरात भांडणं होतात. पण यांमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होते. अशातच आता ईशा मालवीया ही अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या नात्याविषयी मन्नारा व सना रईस खान यांच्याबरोबर चर्चा करताना दिसत आहे. या चर्चेदरम्यान तिने अंकिता-विकी यांच्या नात्याविषयी अनेक खुलासेही केले. (Isha Malviya Gossip About Ankita Lokhande And Vicky Jain)
‘बिग बॉस’च्या नुकत्याच झालेल्या एका भागात अंकिताला ‘बहीण’ व विकी जैनला ‘भाऊ’ मानणारी ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा व सना रईस खान यांच्याबरोबर अंकिता-विकी यांच्या नात्याबद्दल चर्चा करताना दिसली. यावेळी तिने विकीचे अंकिता लोखंडेबरोबरचे लग्न ही स्वर्गात बनलेली जोडी नसून फक्त एक गुंतवणूक असल्याचे सांगितले. यावेळी ईशा असं म्हणाली की, “एकदा विकी भाई व माझी चर्चा झाली. तेव्हा मी त्याला विचारले होते की, नशीब किंवा आयुष्य यांपैकी तुझा कशावर विश्वास आहे? तेव्हा तो माझा नशिबावर विश्वास नाही असं म्हणाला होता. त्यानंतर तिने विकीला असं विचारले की, अंकिताला भेटताच क्षणी तु तिच्याशी लग्न करणार असं ठरवलं होतं का?” यावर विकीने अंकिताबरोबरचे त्याचे लग्न हे नशीब नसून ती माझी एक प्रकारची गुंतवणूक आहे.” असे उत्तर दिले.
आणखी वाचा – “ट्रकने मागून कारला धडक दिली अन्…”, गरोदरपणातच रुबीना दिलैकचा झाला होता भयानक अपघात, म्हणाली, “माझं डोकं…”
यापुढे ईशा असं म्हणाली की, “हे ऐकून मला धक्काच बसला. त्याने मला सांगितले की त्याने मुंबईत येऊन काही मित्र बनवले. अंकिता व विकी हे त्यांच्या काही कॉमन मित्रांद्वारे पहिल्यांदा भेटले, यानंतर त्यांनी एकमेकांना डेट केले. त्यानंतर काही काळाने त्यांनी लग्न केले. विकीne त्यांचं नातं पुढे नेण्यासाठीच काही मित्र तयार केले.” यावर मन्नारा असं म्हणाली की, “याचा अर्थ विकी हा कायम एका सेलिब्रिटी जोडीदाराच्याच शोधात होता.” यावर पुन्हा ईशाने असे म्हटले की, “विकीने ओरिबाबतही असेच केले. विकीला तर त्याचे पूर्ण नाव माहीत नसूनदेखील तो त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. जेणेकरून ओरीमुळे विकी हा घरात सुरक्षित राहील. प्रत्येक व्यक्ती हा विकीसाठी केवळ एक गुंतवणूकच आहे.”
दरम्यान, ईशा व मन्नारा यांच्या अंकिता-विकीबद्दलच्या या चर्चेमुळे सोशल मीडियावर पती-पत्नीच्या या नात्याविषयी अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर अंकिता-विकी यांच्या नात्यातील खरेपणावरही चाहत्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यात काही दुरावा निर्माण होणार का? याविषयी चाहत्यांना हुरहूर लागली आहे.