शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Dinesh Phadnis Passes Away : ‘सीआयडी’ फेम फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांचं निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 5, 2023 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dinesh Phadnis Passes Away Marathi News

CID मालिका अभिनेता दिनेश फडणीस यांचे निधन

CID Actor Dinesh Phadnis Dies at 57 : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘सीआयडी’मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे आज मंगळवार (५ डिसेंबर) रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. शरीरातील बरेचसे अवयव निकामी झाले असल्याने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील तुंगा रुग्णालयात ते उपचार घेत होते. काल रात्री त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं. मुंबईत सकाळी १०.३० वाजता अभिनेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दिनेश यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सीआयडी या शोमध्ये दया यांची भूमिका करणारे अभिनेते दयानंद शेट्टी यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “दिनेशने १२.०८ वाजता अखेरचा श्वास घेतला” असल्याचं समोर आलं. मुंबईच्या तुंगा रुग्णालयात गेले काही दिवस ते उपचार घेत होते. दिनेश यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं समोर आलं होतं. मात्र आज अचानक त्यांच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला आहे.

आणखी वाचा – ‘सिंघम अगेन’च्या सेटवर अजय देवगणला गंभीर दुखापत, अ‍ॅक्शन सीन शूट करताना डोळ्याला जखम झाली अन्…

हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, ‘सीआयडी’ मालिकेतील दिनेश यांचे सहकलाकार अभिनेते दयानंद शेट्टी यांनी हे वृत्त नाकारले होते. यावेळी दिनेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे, शेट्टी यांनी सांगितले होते. त्यानंतर शेट्टी यांनी सांगितलं की, “दिनेश यांना हृदयविकाराचा झटका आला नसून त्यांचं यकृत खराब झालं होतं” असं त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा – “पारंपरिक पोशाख, फुलांची सजावट अन्…”, मुग्धा वैशंपायनच्या बहिणीच्या ग्रहमख विधीतील साधेपणाने वेधलं लक्ष

१९९८ साली प्रसारित झालेल्या सोनी टीव्हीवरील तसेच तब्बल वीस वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या CID या दीर्घकाळ सुरु असणाऱ्या टीव्ही शोमध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारल्यानंतर दिनेश हे घराघरात लोकप्रिय झाले. ‘सीआयडी’ व्यतिरिक्त ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्येही दिसले होते. या शोमध्ये त्यांनी छोटीशी भूमिका केली होती. पण त्यांच्या छोट्याश्या भूमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच आमिर खानच्या ‘सरफरोश’ या चित्रपटातही त्यांनी काम केले होते.

Tags: cidcid actordinesh phadnisdinesh phadnis deathdinesh phadnis passed awaydinesh phadnis passes awayentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
bollywood actor ajay devgn accident during the shooting of the movie singham again set

'सिंघम अगेन'च्या सेटवर अजय देवगणला गंभीर दुखापत, अ‍ॅक्शन सीन शूट करताना डोळ्याला जखम झाली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.